Thu, Jan 28, 2021 04:08मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उद्या 'धमाका'; संजय राऊतांनी दिला इशारा! (video)

Last Updated: Nov 26 2020 1:34PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती होणार असल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली आहे. याचा प्रोमो त्यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. घेण्यात आलेली मुलाखत शुक्रवारी प्रसिद्ध होणार आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनी प्रोमो शेअर करते वेळेस उद्या धमाका होणार असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. 

या प्रोमोमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी केली असल्याचे पाहयला मिळत आहे. संजय राऊत यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना हे सरकार आपल्याच ओझ्याने पडेल अशी अनेक ज्योतिष आणि भाकिते वर्तवली जात आहेत अशी विचारणा केली. यासंबंधी उद्धव ठाकरेंनी भाष्य केलेले दिसत असून असे बोलणाऱ्यांचे दात पडायला आले आहेत असा टोला लगावला आहे. “सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा आणि १० सूड काढू,” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला आहे.

“आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब, मुलं बाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही धुतल्या तांदळ्याचे नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ते आम्ही शिजवू शकतो,” असा इशाराही उद्धव ठाकरे देताना दिसत आहेत.

तसेच, मुख्यमंत्री हात धुवा याच्यापलीकडे काय सांगतात अशी एक टीका वारंवार विरोधकांकडून केली जाते. यासंबंधीबीही संजय राऊत यांनी विचारणा केलेली दिसत आहे. त्यावर उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे की, “हात धुतो आहे. जास्त अंगावर आलात तर हात धुवून मागे लागेन”. “विकृत बुद्धीचे चाळे करु नका. आव्हान मिळलं तेव्हा मला स्फुर्ती येते. आडवं येणाऱ्यांना आडवं करुन महाराष्ट्र पुढे जाईल,” असेही ते म्हणाल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.