Thu, Oct 01, 2020 17:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे पुन्हा देशातील टॉप फाईव्हमध्ये!  

लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे पुन्हा देशातील टॉप फाईव्हमध्ये!  

Last Updated: Aug 08 2020 12:32PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

कोरोनाच्या संकटकाळात परिस्थिती उत्तमरित्या हाताळलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुन्हा एकदा देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. मूड ऑफ नेशन या नावाने केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. इंडिया टुडे आणि कार्वी इनसाइट्स यांनी संयुक्तपणे हे सर्वेक्षण केले आहे.

वाचा : अखेर प्रतीक्षा संपली; जगातील पहिल्या कोरोना लसीची होणार नोंदणी

या सर्वेक्षणात २४ टक्के लोकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे काम चांगले असल्याचे सांगत सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून त्यांना पसंती दिली आहे. गेल्या जानेवारीत केलेल्या सर्वेक्षणात १८ टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्री म्हणून कामगिरी चांगली असल्याचे मत नोंदवले होते. आता त्यांची लोकप्रियता वाढली असल्याचे या सर्वेक्षणातून दिसून येत आहे.

तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या यादीत पाचव्या स्थानी आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांचे काम चांगले असल्याचे ७ टक्के लोकांनी म्हटले आहे. त्यांची लोकप्रियता वाढली असल्याचा निष्कर्ष या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. 

वाचा : पूरग्रस्त 'त्या' चिमणी-पाखरांना मिळालं जीवदान!

 दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देशातील सर्वांत दुसरे लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत.  १५ टक्के लोकांनी त्यांचे काम चांगले असल्याचे म्हटले आहे. तिसऱ्या स्थानी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी आहेत. ११ टक्के लोकांनी त्यांच्या कार्यपद्धतीला पसंती दर्शवली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कामाचे ९ टक्के लोकांनी कौतुक केले आहे. त्या देशातील चौथ्या सर्वांत लोकप्रिय मुख्यमंत्री ठरल्या आहेत. मात्र, जानेवारीच्या तुलनेत त्यांची लोकप्रियता काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले आहे. जानेवारीमध्ये ११ टक्के लोकांनी त्यांचे काम चांगले असल्याचे नमूद केले होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संयुक्तरित्या पाचव्या स्थानी आहे.

वाचा : केरळ विमान दुर्घटनेला 'टेबलटॉप रनवे' कारणीभूत; यावर विमानाचे लँडिंग का असते धोकादायक?

जानेवारीच्या तुलनेत उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता वाढली आहे. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची लोकप्रियता कमी झाल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (६ टक्के), तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (३ टक्के), छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (२ टक्के), गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी (२ टक्के), राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (२ टक्के) आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा (२ टक्के) यांचा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांचा यादीत समावेश आहे.

 "