Mon, Apr 12, 2021 03:30
सर्वांधिक मायलेज देणाऱ्या TOP 5 पेट्रोल कार आपल्याला माहीत आहेत का?

Last Updated: Mar 29 2021 7:13PM

संग्रहित छायाचित्र
पुढारी  ऑनलाईन डेस्क 

गेल्या सहा महिन्यांत इंधनांच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. पेट्रोलने शंभरी पार केली आहे, तर डिझेलची सुद्धा त्याच दिशेने वाटचाल सुरु आहे. त्यामुळे घरातून वाहन बाहेर पडताना दहावेळा विचार करावा लागत आहे. सध्या वाहन खरेदी करताना सर्वप्रथम ते वाहन किती मायलेज देतात याचा विचार प्राधान्याने केला जात आहे. अलीकडील यासाठी अधिक मायलेज देणाऱ्या कार हव्या असतील तर डिझेल किंवा सीएनजी कार खरेदी करा असा पर्याय दिला जातो. 

अधिक वाचा : प्रधानमंत्री जन धन योजनेचा लाभ कसा घ्यावा?

पेट्रोल कारमध्ये तुम्हाला अधिक शक्ती आणि मायलेज कमी मिळेल असे म्हटलं जात. परंतु हे पूर्णपणे सत्य नाही. बाजारात अशा अनेक पेट्रोल कार आहेत ज्या डिझेल कारपेक्षा अधिक मायलेज देतात. आज आम्ही तुम्हाला सर्वात जास्त मायलेज असलेल्या 5 सर्वात इंधन-कार्यक्षम पेट्रोल कारबद्दल सांगत आहोत.

मारुती सुझुकी डिझायर 

ही मारुतीची लोकप्रिय कॉम्पॅक्ट सेडान कार आहे. कारच्या मायलेज-डायरेक्टिंग बॉडी एआरएआयनुसार, मारुती सुझुकी डिजायरचा एएमटी ट्रान्समिशन व्हेरिएंट 24.12kmpl चे मायलेज देते. म्हणजेच ही कार 1 लिटरमध्ये 24 किमी धावते. या कारचे पेट्रोल इंजिन 1197 सीसी आहे, जे 88.5 बीएचपीची उर्जा जनरेट करते.

अधिक वाचा : गाय, म्हैस, शेळी, कुक्कुट पालन शेड बांधकामासाठी ठाकरे सरकारची भन्नाट योजना माहीत आहे का?

टोयोटा ग्लान्झा

ही मारुती सुझुकी बलेनो आधारित टोयोटाचे मॉडेल आहे. या कारची थेट स्पर्धा Hyundai i20 आणि Tata Altroz या कारशी आहे. यात सौम्य-संकरित (माइल्ड-हायब्रिड) तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे कार 23.87kmpl पर्यंतचे मायलेज देते. डिजायर प्रमाणेच या कारमध्येही1197 सीसीचे पेट्रोल इंजिन आहे, जे 88.5 बीएचपीची उर्जा उत्पन्न करते.

टाटा टियागो

ही देशातील सर्वात सुरक्षित हॅचबॅक वाहनांपैकी एक आहे. टाटासाठी हे एक यशस्वी उत्पादन राहिलं आहे. ही कार मारुती सुझुकी सेलेरिओ आणि वॅगनआर सारख्या कारशी स्पर्धा करते. एआरएआयच्या म्हणण्यानुसार टाटा टियागोचे एएमटी ट्रान्समिशन व्हेरिएंट 23.84 किलोमीटर मायलेज देते. कारमध्ये1.2-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे 84.48 बीएचपीची उर्जा उत्पन्न करते.

अधिक वाचा : ...असा आहे 'सुएझ कालव्या'चा रंजक इतिहास; कालव्यावरील वर्चस्वासाठी 'या' देशांमध्ये झाली युद्धं

मारुती स्विफ्ट

ही देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांपैकी एक आहे. अलीकडेच कारचे नवीन फेसलिफ्ट मॉडेल बाजारात आणले गेले आहे, त्यात इंजिन बदलले आहे, त्याचबरोबर मायलेजही वाढले आहे. कंपनीने यात एक 1.2 लिटरचे DualJet पेट्रोल इंजिन दिले आहे. नवीन स्विफ्टचे मॅन्युअल व्हेरिएंट 23.20 केएमपीएल आणि स्वयंचलित (ऑटोमेटिक) व्हेरिएंट 23.76 केएमपीएल देते.

रेनो क्विड

मिनी एसयूव्हीसारखी दिसणारी ही हॅचबॅक कार जेव्हा बाजारात आली तेव्हा ती चर्चेत होती. तिच्या किंमत श्रेणीमध्ये, ती मारुती सुझुकी अल्टो, मारुती सुझुकी एस्प्रेसो आणि डटसन रेडी-गो सारख्या कारशी स्पर्धा करते. एआरएआयच्या म्हणण्यानुसार रेनो क्विडचे मॅन्युअल ट्रांसमिशन व्हेरिएंट 22.3kmpl चे मायलेज देते.