Mon, Apr 12, 2021 02:18
करीना कपूरच्या 'या' २५ हजारांच्या मास्कमध्ये आहे तरी काय? 

Last Updated: Apr 07 2021 6:35PM

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

एकीकडे देशात मास्क न वापरल्याने दंडात्मक कारवाई केली जात आहे. दुसरीकडे मात्र, बी-टाऊनचे कलाकार हजारो रुपयांचा मास्क वापरताना दिसत आहेत. नुकताचं बॉलिवूडची बेबो करीना कपूर तिच्या खास मास्कवरून चर्चेत आली आहे. तिच्या या मास्कमध्ये आहे तरी काय? कलाकारांचे मास्क ही फॅशन आयकॉन होण्याची शक्यता आहे. 

मागील काही दिवसांमध्ये बॉलिवूडमधील रणबीर कपूर, विक्की कौशल, कॅटरीना कैफ, गोविंदा, परेश रावल, भूमी पेडनेकर, अक्षय कुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यामतून लोकांना काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. आता करीना कपूरनेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोनापासून बचावासाठी मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. पण, यापेक्षा अधिक करीनाच्या मास्कच्या किमतीने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

करीनाने आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती मास्क लावलेली दिसत आहे. हा काळा रंगाचा मास्क असून एका प्रसिध्द ब्रँडचा हा मास्क आहे. तिने आपल्या फोटोला कॅप्शन लिहिलीय-'No propaganda, just wear your mask 😎😎😷' 

विशेष म्हणजे मीडिया रिपोर्टनुसार, या मास्कची किंमत २५ हजार ९९४ रु. आहे. या हजारो किमतीच्या मास्कमध्ये आहे तरी काय? याची उत्सुकता फॅन्सना लागून राहिली आहे.