Wed, May 19, 2021 05:26
SBI SCO Recruitment 2021 : SBI मध्ये मोजक्याच जागांसाठी भरती!

Last Updated: Apr 15 2021 4:13PM

संग्रहित छायाचित्र
पुढारी ऑनलाईन डेस्क 

स्टेट बँक ऑफ इंडियाने पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून स्पेशलिस्ट केडर ऑफिसर (एससीओ) पदे भरण्यासाठी अर्ज मागविले आहेत. या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार sbi.co.in वर भेट देऊन अर्ज करू शकतात. एसबीआय एससीओच्या एकूण पदांची संख्या 149 आहे.

अधिक वाचा : whatsapp कॉल रेकॉर्ड कसा करायचा बरं?

या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 मे 2021 आहे. पात्रतेच्या अटी, निवड प्रक्रिया आणि वेतनमानासह अन्य माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर तपासून घेतली पाहिजे. 

अधिक वाचा : सर्वांधिक मायलेजच्या आहेत 'या' ५ पेट्रोल कार!

रिक्त स्थान तपशील :

डेटा विश्लेषक 8

फार्मासिस्ट 67

मुख्य आचार्य अधिकारी 1 

सल्लागार (फसवणूक जोखीम व्यवस्थापन) 4

उपव्यवस्थापक 10

व्यवस्थापक 51

कार्यकारी 1

उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (आयटी-डिजिटल बँकिंग) १

वरिष्ठ विशेष कार्यकारी 3 

वरिष्ठ कार्यकारी 3 

शैक्षणिक पात्रता : प्रत्येक पदाची पात्रता वेगळी असते, म्हणून उमेदवारांना एसबीआयच्या वेबसाईटवर जाऊन संपूर्ण भरती अधिसूचना पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

अर्ज फी : 750 रुपये (सर्वसाधारणसाठी), एससी-एसटी आणि अपंग उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षेत यशस्वी उमेदवारांची मुलाखत असेल. यानंतर निवड यादी तयार केली जाईल.

वेबसाईट - sbi.co.in

अधिक वाचा : अद्भूत! निसर्गातील 'ही' रहस्यमय ठिकाणं पाहून तुमचेही विस्फारतील डोळे