पुढारी ऑनलाईन डेस्क
चित्रपट इंडस्ट्रीचे दिग्गज अभिनेते जितेंद्र आज ७ एप्रिल, १९४२ रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला होता. जितेंद्र आज ७९ वर्षांचे झाले आहेत. आपल्या दमदार अभिनयासाठी जितेंद्र यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक शानदार चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जितेंद्र यांचे फॅन्स त्यांना ‘जम्पिंग जॅक’च्या नावाने बोलवायचे. जितेंद्र यांनी शोभा यांच्याशी लग्न केले. परंतु, तुम्हाला माहिती आहे का, कधी काळी ते एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांच्या प्रेमात होते.
चित्रपट ‘एक बेचारा’ १९७२ मध्ये रिलीज झाला होता. बी. एन. घोषने जितेंद्र आणि रेखा यांना आपल्या या चित्रपटात घेतले. एक बेचारा चित्रपटाते शूटिंग सिमलामध्ये होते. त्यावेळी दोघांच्या रोमान्स चर्चा सुरू झाल्या. इतकचं नाही तर शूटिंगनंतर दोघांच्या भेटीगाठीचा सिलसिला मुंबईमध्ये सुरू राहिला होता. मीडिया रिपोर्टनुसार, दोघे आपापसात अधिक वेळ घालवू लागले. आणि दोघांमध्ये जवळीकताही वाढू लागली.
असं म्हटलं जातं की, रेखा त्यावेळी जितेंद्र यांच्या इतकी प्रेमात होती की, जितेन्द्र यांची एक झलक पाहण्यासाठी त्या सेटवर लपून छपून जायच्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जितेंद्रचे शूटिंग पाहण्यासाठी त्यांनी पोलिसांची काठीदेखील खाल्ली होती.
रेखा यांची आई पुष्पावल्ली यांनादेखील रेखासाठी जितेंद्र आवडले होते. परंतु, त्यांच्या लव्ह स्टोरीत ट्विस्ट होतं. जितेंद्र रेखा यांची मैत्री असताना जितेंद्र शोभा नावाच्या एअर होस्टेसवरदेखील फिदा होते. या गोष्टीवरून रेखा आणि जितेंद्रमध्ये भांडणे व्हायची. या वादाचा परिणाम असा झाला की, दोघांचा पुढील चित्रपट 'अनोखी अदा'मध्ये दोघांमध्ये तणाव स्पष्ट दिसत होता. दोघे शूटिंगवेळी दोघांनी सर्वांसमोर वाद घातला.
जितेंद्र यांनी ३१ ऑक्टोबर, १९७४ रोजी गर्लफ्रेंड शोभा कपूरशी लग्न केले. जितेंद्रशी लग्न करण्यासाठी शोभा कपूर यांनी आपली नोकरीदेखील सोडली होती. रेखा आणि जितेंद्र यांनी पुढे अनेक चित्रपटांमध्ये एकत्र अभिनय केला. मोठ्या पडद्यावर यांची जोडी खूप हिट होती.