Wed, Oct 28, 2020 10:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › योगीजी; गँगरेप करणार्‍यांना कडक शिक्षा द्या : जयंत पाटील

योगीजी; गँगरेप करणार्‍यांना कडक शिक्षा द्या : जयंत पाटील

Last Updated: Sep 29 2020 4:17PM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

उत्तर प्रदेशच्या हथरस येथे महिलेवर झालेल्या गँगरेपबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दुःख व्यक्त केले आहे. हे प्रकरण गंभीरतेने घेवून आरोपींना कडक शिक्षा द्या अशी मागणी जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे. 

जिथे गंगा, यमुना यांची संस्कृती वास करते. ज्या भूमीचं प्रतिनिधीत्व स्वर्गीय इंदिरा गांधी, स्वर्गीय राजीव गांधी, स्वर्गीय कांशीराम आणि अशा अनेक महान व्यक्तींनी केले. त्या भूमीतून अशी खबर येते त्यावेळी मनाला फार दु:ख होते. या घटनेकडे गांभीर्याने पाहून आरोपींवर कारवाई करा असे मंत्री जयंत पाटील यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यात झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. १९ वर्षीय या पीडितेवर १४ सप्टेंबरला सामुहिक बलात्कार झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकारानंतर आरोपींनी पीडितेची जीभ कापली तसेच, इतकेच नव्हे तर घरापर्यंत जावू नये म्हणून पीडितेच्या पाठीजवळ हाडांना दुखापत केली. तिच्यावर दिल्ली येथील सफदरजंग रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. 

 "