Thu, Oct 01, 2020 23:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरोना रुग्ण संख्येत भारत जगात सहाव्या क्रमांकावर; इटलीला मागे टाकले

कोरोना रुग्ण संख्येत भारत जगात सहाव्या क्रमांकावर; इटलीला मागे टाकले

Last Updated: Jun 06 2020 7:21PM

File Photoनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

कोरोना रुग्ण संख्येच्या बाबतीत भारताने युरोपमधील इटलीला मागे टाकले आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 36 हजार 657 वर गेली आहे. रुग्ण संख्येचा विचार केला तर भारत आता जगात सहाव्या क्रमांकावर आला आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या देखील वाढून 6642 इतकी झाली आहे.

वाचा : 'अनलॉक'मुळे भारतात होऊ शकतो कोरोनाचा मोठा उद्रेक : WHO

सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 9 हजाराच्या वर वाढली आहे. मागील चोवीस तासांत रुग्णांची संख्या 9 हजार 887 ने वाढल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. एका दिवसातील रुग्णवाढीचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. 

कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 लाख 15 हजार 942 इतकी असून उपचाराअंती बरे झालेल्यांची संख्या 1 लाख 14 हजार 72 इतकी आहे. कोरोना रुग्ण संख्येत वेगाने वाढ होत असली तरी केंद्र सरकारने येत्या लॉकडाऊन टप्प्या-टप्प्याने संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. अनलॉकिंगची सुरुवात सोमवारपासून होत आहे. 

वाचा : मास्क वापरण्यासंबंधी 'डब्ल्यूएचओ'ची 'ही' आहेत नवीन मार्गदर्शक तत्त्वे  

रुग्ण संख्या वाढत आहे पण त्याचवेळी उपचाराअंती बरे होत असलेल्याची संख्या वाढत आहे, ही समाधानाची बाब आहे. जागतिक पातळीवर कोरोनाचा विचार केला तर जगातील रुग्ण संख्या 67 लाखांवर पोहोचली असून मृतांचा आकडा 3 लाख 94 हजार 875 वर गेला आहे.

 "