Tue, Sep 29, 2020 19:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'तो' उद्योगपती 'ती' सरकारी नोकरदार, लग्नही गोडीत ठरलं असताना चर्चेत आला पीएम मोदींचा मुद्दा आणि...

'तो' उद्योगपती 'ती' सरकारी नोकरदार, लग्नही गोडीत ठरलं असताना चर्चेत आला पीएम मोदींचा मुद्दा आणि...

Last Updated: Jul 06 2020 10:17AM

संग्रहित छायाचित्रलखनऊ : पुढारी ऑनलाईन

राजकारणात राजकीय मतभेद जरूर असावेत, पण मनभेद असू नये असे म्हटले जाते. राजकारणाने अनेकांची डोकी फुटल्याची अनेक प्रकरणे देशात समोर आली आहेत. सोशल मीडियातही आता राजकारणावर सखोल चर्चा होताना दिसते. मात्र या सर्वांना छेद देणारी घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. 

अधिक वाचा : प्रियांका गांधींचा 'तो' बंगला 'या' भाजप खासदारला मिळाला!

गोडी गुलाबाने ठरलेल्या लग्नात पीएम मोदींचा विषय आला. या विषयावर चर्चा एवढ्या पातळीवर गेली की, लग्न मोडीत निघाले. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.  ही घटना उत्तर प्रदेशातील असली, तरी शहर आणि त्या मतभेद झालेल्यांची नावे दिलेली नाहीत. केवळ पीएम मोदींवर तीव्र टोकाचे मतभेद झाल्याने लग्नात खोडा घातला गेला. त्याचे झाले असे की, उत्तर प्रदेशात पेशाने व्यावसायिक असलेल्या उद्योगपतीचे आणि सरकारी नोकरदार असलेल्या युवतीचे लग्न ठरले. 

अधिक वाचा : पीएम इम्रान खान यांना तिसऱ्या बायकोवर झालेली टीका झोंबली अन्‌ महिला आमदाराला...

लग्नाची अंतिम बोलणी करण्यासाठी उभयतांनी मंदिरात भेटण्याचे ठरले होते. सर्व काही सुरळीत सुरु असतानाच चर्चेत देशातील आर्थिक स्थितीचा मुद्दा अचानक उपस्थित झाला. यावेळी देशातील स्थितीला मोदीच कारणीभूत असल्याचा युक्तीवाद त्या युवतीने केला.  त्यानंतर मोदी प्रेमी असलेल्या त्या उद्योगपतीला आपल्या होणाऱ्या बायकोचा युक्तीवाद अजिबात पटला नाही. त्याने सगळे आरोप परतावून लावले. हा वाद इतका टोकाला गेला की, ठरलेलं लग्न मोडून टाकण्यात आले. 

अधिक वाचा : 'त्याबाबत' चीनकडून प्रथमच कबुलीनामा!

या दोघांनी घेतलेल्या निर्णयामुळे दोन्हीकडील कुटुंब चांगलेच हैराण झाले. त्या दोघांनी विवाह करणार नसल्याचे स्पष्ट सांगून टाकले. 

अधिक वाचा : पाकिस्तानच्या वाटेवर नेपाळ!

 "