Fri, Sep 25, 2020 19:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हॉटेल बिले, वैद्यकीय विमा प्रीमियम, लाखापेक्षा जास्त शाळेची फी सुद्धा आता आयकर खात्याच्या रडारवर!

हॉटेल बिले, वैद्यकीय विमा प्रीमियम, लाखापेक्षा जास्त शाळेची फी सुद्धा आता आयकर खात्याच्या रडारवर!

Last Updated: Aug 14 2020 3:29PM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

करप्रणालीत पारदर्शकता तसेच सुटसुटीतपणा आणण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने अलीकडेच कर सुधारणा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार करदात्यांकडून भरल्या जाणाऱ्या फॉर्म २६ एएस वर आता आयकर खात्याची करडी नजर असणार आहे. हॉटेलची बिले, वीस हजार रुपयांपेक्षा जास्तचा वैद्यकीय विमा प्रीमियम, एक लाख रुपयांपेक्षा जास्त शाळेची फी असे सारे काही येणार आयकर खात्याच्या रडारवर येणार आहे. 

केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतेवेळी केंद्र सरकारने टॅक्स चार्टरची घोषणा केली होती. त्यानुसार करप्रणालीत अलीकडेच व्यापक सुधारणा करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील गुरुवारी या सुधारणांची घोषणा केली होती. करदात्यांच्या आर्थिक व्यवहारांचा सखोल तपशील जमवून कराचा बेस वाढविण्याचे आयकर खात्याचे उद्दिष्ट आहे. या पार्श्वभूमीवर फॉर्म २६  मध्ये आगामी काळात विस्तृत माहिती करदात्यांना भरावी लागू शकते. 

हॉटेल बिले, वीस हजार रुपयांपेक्षा जास्तचा वैद्यकीय विमा प्रीमियम, एक लाख रुपयांपेक्षा जास्त शाळेची फी,50 हजार रुपयांपेक्षा जास्तचा एलआयसी हप्ता, वार्षिक एक लाख रुपयांपेक्षा जास्त विजेची बिले, देशांतर्गत किंवा विदेशात बिझनेस क्लासने विमान प्रवास, एक लाख रुपयांपर्यंत जास्त किंमतीची दागिने, पेंटिंग्ज वा ग्राहकोपयोगी वस्तू खरेदी, 20 रुपयांवर संपत्ती कर, शेअर मार्केटमधील व्यवहार, 50 लाख रुपयांपर्यंत जास्तचा पैसा बचत अथवा करंट खात्यात जमा करणे, यावर आयकर खात्याची नजर जाऊ शकते.

 "