नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्रातील कोविडची गंभीर वस्तुस्थिती जाणून न घेताच केंद्र सरकार महाराष्ट्राला लक्ष्य करत आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत ८० % आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले आहे तर ७३ % फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण केले आहे.
अधिक वाचा : सचिन वाझे आणि शिवसेनेचं नातं काय? : जावडेकर
जेष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात महाराष्ट्र देशात पाचवा आहे. ही सर्व आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचीच आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला योग्य प्रमाणात लसींचा पुरवठा केला आहे का? असा प्रश्न केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी आरशासमोर उभे राहून स्वतःला विचारावा. कोरोना लसींचा पुरेसा पुरवठा न करणे यासह संपूर्ण कोरोना लसीकरण कार्यक्रमाचा केंद्र सरकारने बट्ट्याबोळ केला आहे. अशी खरमरीत टिका माजी केंद्रिय मंत्री पी. चिदंबरम यांनी केली आहे.