Tue, Sep 29, 2020 19:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र सुरुच!

सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र सुरुच!

Last Updated: Aug 10 2020 4:40PM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी ऑनलाईन

राज्यात गेल्या  दोन ते तीन महिन्यांपासून सनदी अधिकाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरु आहे. आज (ता.१०) पाच सनदी अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद म्हैसेकर यांची मंत्रालयात प्रधान सचिव (वन विभाग) म्हणून वर्णी लागली आहे. ते १९९२ च्या बॅचचे अधिकारी आहेत.

मंत्रालयातील अन्न, नागरी वितरण आणि ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव संजय खंदारे यांची बदली  महाजेनकोच्या अध्यक्ष आणि कार्यकारी संचालकपदी करण्यात आली आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची मंत्रालयात मुख्य सचिव कार्यालयामध्ये उपसचिव म्हणून वर्णी लागली आहे.  

नवी मुंबईमधील जलस्वराज प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक ए. ए. गुल्हाणे यांची चंद्रपूर जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी के. एच. बागटे यांची श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी वर्णी लागली आहे. 

 "