Mon, Apr 12, 2021 03:50




कोरिओग्राफर धर्मेशला कोरोनाची लागण

Last Updated: Apr 08 2021 5:02PM





मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार कोरोनाच्या विळख्यात आहेत. कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आता यामध्ये एका प्रसिध्द कोरिओग्राफरच्या नावाचा समावेश झाला आहे. लोकप्रिय कोरिओग्राफर धर्मेशला कोरोनाची लागण झाली आहे.  

सूत्रांच्या माहितीनुसार, डान्स दीवाने-३ च्या सेटवरील १८ क्रू मेंबरना कोरोनाची लागण झाली होती. आता या शोचा परिक्षक धर्मेश याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या शोच्या निर्मात्यांनी धर्मेश कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली.  

वाचा - फरहान अख्तरसोबत मृणाल ठाकूरचा मराठी तडका

रणबीर कपूर, विक्की कौशल, कॅटरीना कैफ, गोविंदा, परेश रावल, भूमी पेडनेकर, अक्षय कुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यामतून लोकांना काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत.