Fri, Sep 25, 2020 18:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जगातील चौथे अब्जाधीश असलेल्या मुकेश अंबानींच्या संपत्तीचे 'हे' असणार वारसदार!

जगातील चौथे अब्जाधीश असलेल्या मुकेश अंबानींच्या संपत्तीचे 'हे' असणार वारसदार!

Last Updated: Aug 14 2020 4:12PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​प्रमुख आणि देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी ‘फॅमिली कौन्सिल’ स्थापन करणार आहेत. या फॅमिली कौन्सिलची भविष्यात वारसांबद्दल वाद होऊ नये यासाठी स्थापन करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची थेट माहिती असलेल्या दोन सूत्रांनी अधिक माहिती देताना सांगितले की, उत्तराधिकार योजनेंतर्गत कुटुंबातील सर्व सदस्यांना समान अधिकार मिळतील. मुकेश अंबानी यांची वैयक्तिक संपत्ती सध्या 5 लाख 94 हजार 690 कोटी रुपये आहे आणि ते जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.

अधिक वाचा : हॉटेल बिले, वैद्यकीय विमा प्रीमियम, लाखापेक्षा जास्त शाळेची फी सुद्धा आता आयकर खात्याच्या रडारवर!

मुकेश अंबानी यांनी आपली मुले आकाश आणि अनंत अंबानी यांच्यासह मुलगी ईशा अंबानीला संपत्तीमध्ये वाटा देण्याचा निर्णय घेतला आहे. लाइव्ह मिंटने दिलेल्या वृत्तानुसार हे पाऊल उत्तराधिकार योजना म्हणून आहे. यात मुकेश अंबानींच्या तीन मुलांसह कुटुंबातील सर्व प्रौढ सदस्यांचा समावेश असेल. याव्यतिरिक्त, मार्गदर्शक आणि सल्लागार देखील यात सामील होऊ शकतात. रिलायन्स इंडस्ट्रीजशी संबंधित निर्णय घेण्यात या परिषदेची महत्त्वपूर्ण भूमिका असेल. या फोरमवर, कंपनीशी संबंधित सर्व निर्णयांवर मत घेण्याचा प्रयत्न केला जाईल जेणेकरून कोणतेही मतभेद उद्भवू शकणार नाहीत.

अधिक वाचा : गुड न्यूज! कोरोनावरील लसीची पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल यशस्वी

तज्ज्ञांचे मत आहे की मुकेश अंबानी यांना हे पाऊल उचलण्याची इच्छा आहे जेणेकरुन भविष्यात त्यांचे आणि भाऊ अनिल अंबानी यांच्यात जे घडले तसे परत व्हायला नको. वडील धीरूभाई अंबानी यांच्या आकस्मिक निधनानंतर दोन्ही भावांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि बऱ्याच वादानंतर व्यावसायिक साम्राज्याची वाटणी झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांना पुढच्या वर्षाच्या अखेरीस त्यांची उत्तराधिकारी योजना पूर्ण करायची आहे.

अधिक वाचा : कर्ज देणार नाही, तेलाचा पुरवठाही नाही, घेतलेले पैसेही परत करा; पाकिस्तानला सौदीकडून तगडा हादरा!

मुकेश अंबानी यांनी हा निर्णय अन्य देशांच्या उद्योगपती घराण्यांच्या धर्तीवर घेतला आहे. जेथे सर्व प्रकारच्या वादांचे निराकरण एकाच व्यासपीठावर करता यावे यासाठी परिषद स्थापन करण्याची परंपरा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या माध्यमातून सर्व वारसांना समान हक्क मिळतील आणि ते रिटेल, डिजिटल आणि उर्जा व्यवसायासारखे वेगवेगळे व्यवसाय हाताळतील.

अधिक वाचा : अजित पवार नाराज?; सुनील तटकरे आणि धनंजय मुंडेंनी घेतली शरद पवारांची भेट

मुकेश अंबानी यांनी या क्षणी आपल्या तीन मुलांना वेगवेगळ्या भूमिका दिल्या आहेत. मोठा मुलगा आकाश आणि मुलगी ईशा अंबानी २०१४ पासून रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय जिओ प्लॅटफॉर्मच्या मंडळामध्येही त्यांचा समावेश करण्यात आला आहे. यावर्षी मार्चमध्ये लहान मुलगा अनंत अंबानी यांना मुकेश अंबानी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये अतिरिक्त संचालक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. ईशा अंबानी संचालक म्हणून रिलायन्स फाऊंडेशनमध्येही सामील आहेत. त्याच्या प्रमुख त्यांची आई नीता अंबानी आहेत.

 "