Tue, Aug 04, 2020 10:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यपालांना भेटून डॉ. योगेश जाधव यांनी वाढदिवसानिमित्त केले अभिष्टचिंतन

राज्यपालांना भेटून डॉ. योगेश जाधव यांनी वाढदिवसानिमित्त केले अभिष्टचिंतन

Published On: Feb 12 2019 5:47PM | Last Updated: Feb 12 2019 5:47PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या वाढदिवसानिमित्त आज राजभवनावर त्यांची भेट घेऊन अनेकांनी अभिष्टचिंतन केले. राज्याच्या उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष आणि दै. पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांनीही राज्यपालांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवाजी विद्‍यापीठाचे कुलगुरू डॉ देवानंद शिंदे ही उपस्‍थित होते. 

राजभवनामध्ये जाऊन डॉ. योगेश जाधव यांनी राज्यपालांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. राज्याच्या विकासामध्ये राज्यपाल स्वतः लक्ष घालत असतात. त्याचा वेळोवेळी अनुभव येत असल्याचे डॉ. जाधव म्हणाले. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष या नात्याने राज्यपालांच्याशी अनेकदा संपर्क आला. त्यातून याचा प्रत्यय नेहमीच येतो, असे डॉ. जाधव यांनी सांगितले.

एकेकाळी आंध्रप्रदेशच्या राजकारणात सक्रिय असणारे विद्यासागर राव राज्याचे राज्यपाल आहेत. त्यांनी वाजपेयींच्या काळात केंद्रीय गृहराज्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला होता. तत्कालीन आंध्रप्रदेशातील करिमनगर लोकसभा मतदारसंघाचे बाराव्या आणि तेराव्या लोकसभेमध्ये भाजपचे खासदार म्हणून त्यांनी नेतृत्व केले होते. सत्त्याहत्तर वर्षाच्या विद्यासागर राव यांचे व्यक्तीमत्व आजही तरुणांना लाजवेल असेच आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा डॉ. जाधव यांनी दिल्या.