होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जिओवरील प्रेमापोटी एमटीएनएल, बीएसएनएलचा बळी; नवाब मलिकांचा आरोप

'जिओवरील प्रेमापोटी एमटीएनएल, बीएसएनएलचा बळी'

Last Updated: Oct 10 2019 7:23PM

नवाब मलिक
मुंबई : विशेष प्रतिनिधी 

जिओवरील प्रेमापोटी एमटीएनएल, बीएसएनएल या सरकारी कंपन्यांचा बळी दिला जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केली. एमटीएनएल आणि बीएसएनएल या कंपन्या बंद करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यावर मलिक यांनी सरकारचा समाचार घेतला. 

ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाची सर्व संपत्ती त्यांचे दोन मित्र अदानी-अंबानीकडे सुपूर्द करत आहेत. देशाच्या जनतेने हे कारस्थान ओळखून यांना घरी बसवण्याचा निर्णय घेतला पाहिजे. 

एमटीएनएल आणि बीएसएनएल कंपन्या बंद करण्याचा सल्ला अर्थ मंत्रालयाने दिला आहे. अर्थ मंत्रालयाच्या डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनकडे या दोन्ही कंपन्यांनी पुन्हा मार्गावर येण्यासाठी ७४ हजार कोटी रूपयांची मागणी केली. मंत्रालयाने ही मागणी फेटाळत कंपन्या बंद करण्याचा सल्ला दिला.
 
बीएसएनएल कंपनीवर १४ हजार कोटी रूपयांचे कर्ज आहे. २०१७-१८ मध्ये ३१२८७ कोटीचे नुकसान झाले होते. सध्या कंपनीमध्ये १.७६ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. यामधील काही कर्मचाऱ्यांना सक्तीने घरी पाठवल्यास पुढील पाच वर्षात कर्मचाऱ्यांची संख्या कमी होऊन ७५ हजार इतकी राहिल. सप्टेंबरमध्ये यासंदर्भात बैठक घेण्यात आली होती. 

अधिक वाचा : केंद्र सरकारचा एमटीएनएल आणि बीएसएनएल बंद करण्याचा सल्ला!