Wed, Jun 23, 2021 02:44
दिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

Last Updated: Jun 11 2021 5:26PM

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयातून आज दुपारच्या सुमारास डिस्चार्ज मिळाला आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना पाच दिवसांपूर्वी मुंबईतील खारमधल्या पी डी हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या काळात त्यांची पत्नी सायरा बानो हॉस्पिटलमध्ये त्यांची काळजी घेत होत्या. 

दिलीप कुमार यांच्या स्वत: च्या ट्विटरवर एक पोस्टद्वारे ही माहिती मिळाली आहे. त्यात लिहिले आहे की, 'सर्व लोकांच्या प्रार्थना आणि प्रार्थना घेऊन दिलीप साहेब हॉस्पिटलमधून आपल्या घरी जात आहेत. तुमचे अफाट प्रेम आणि आपुलकी नेहमीच सोबत आहे.' दिलीपकुमार यांचा मित्र फैजल फारुकी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या वृत्तानंतर दिलीपकुमार यांच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.

वाचा: नुसरत जहाँने मला फसवून धोका दिला; निखील जैनचा गंभीर आरोप

रिपोर्टच्या माहितीनुसार, दिलीपकुमार याच्या बुधवारी फुफ्फुसातून पाणी काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. डॉ. नितीन गोखले आणि डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखीखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली. दिलीपकुमार यांची तब्येत गेल्या काही दिवसापूर्वी ढासळली होती. यानंतर त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याच दरम्यान त्यांची काही लोकांनी त्यांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर पसरविली होती. यानंतर दिलीपकुमार यांच्या पत्नीने त्यांची तब्येत ठिक असल्याची माहिती दिली होती. 

वाचा: उर्वशी रौतेलाला 'त्याने' पोटावर मारले दे दणादण पंच! (Video)