Sat, Feb 27, 2021 06:07
धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा आहे तरी कोण?

Last Updated: Jan 13 2021 10:11AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर ओशिवरा पोलिस ठाण्यात एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, 'त्या' महिलेचे आणि माझे सहमतीने संबंध होते, असा खळबळजनक खुलासादेखील धनंजय मुंडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून केला. मुंडे यांच्या स्पष्टीकरणानंतर रेणु शर्मा कोण आहे? असा प्रश्न सध्या समाज माध्यमांमध्ये घोंघावू लागला आहे. 

तर रेणू शर्मा आहे तरी कोण? 

रेणू अशोक शर्मा असे या महिलेचे नाव आहे. रेणू शर्मा ही एक बॉलिवूड गायिका आहे. रेणू शर्मा यांनी तक्रारीत केलेल्या दाव्यानुसार, रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची ओळख १९९७ मध्ये झाली होती. रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची पहिली भेट मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये रेणू यांची बहीण करुणा शर्मा यांच्या घरी झाली होती.

रेणू शर्मा यांचा आरोप?

रेणू यांच्या दाव्यानुसार, रेणू शर्मा यांचे वय १६-१७ इतके होते. धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा या दोघांचा १९९८ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर २००६ मध्ये करुणा या प्रसूतीसाठी इंदोरमध्ये गेल्या. आपण (रेणू) घरात एकटी आहे, हे धनंजय मुंडेना माहिती होते. त्यावेळी धनंजय मुंडे काहीही न सांगता रात्री घरी आले आणि त्यांनी माझ्या इच्छेविरुद्ध माझ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा आरोप रेणू शर्मा यांनी तक्रारीत केला आहे.

यानंतर धनंजय मुंडे यांनी मला वारंवार फोन करत प्रेम करत असल्याची कबुली दिली. तसेच मला सांगितले की, जर तुला गायिका बनायचे असेल, तर मी तुला बॉलिवूडच्या मोठं मोठ्या दिग्दर्शक निर्मांत्याशी भेट घडवून देईन. तुला बॉलिवूडमध्ये लाँच करेन. या नावाखाली धनंजय मुंडेंनी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. तसेच माझी बहीण घराबाहेर गेल्यानंतर धनंजय मुंडे माझ्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करायचे, असे रेणू शर्मा यांनी तक्रारीत म्हटले आहे.

मुंडेंचे स्पष्टीकरण