Sat, Feb 27, 2021 05:56
टूलकिट प्रकरण : दिशा रवी, निकिता जेकब आणि शंतनू हे दिल्ली पोलिसांच्या रडारवर कसे आले?

Last Updated: Feb 15 2021 1:30PM

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

तीन कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाशी संबंधित 'टूलकिट सोशल मीडिया' प्रकरणी दिल्ली पोलिसांनी निकिता जेकब आणि शंतनू नावाच्या इसमाविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. यासंदर्भात पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बंगळूर येथून दिशा रवी नावाच्या महिलेला ताब्यात घेतले होते. 

वाचा : ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरण : कोर्टात बोलताना २१ वर्षीय दिशाला का अश्रू अनावर झाले!

दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम विभागाने टूलकिट प्रकरणात आणखी काही लोकांना अटक केली जाण्याचे संकेत दिले आहेत. निकिता जेकब आणि शंतनू यांच्या भूमिकेचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. खलिस्तान दहशतवादी संघटनेला पुन्हा उभे करणे तसेच भारताला जागतिक पातळीवर बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून टूलकिट तयार करण्यात आली असून ग्रेटा थनबर्गकडून अनावधानाने ही टूल किट सोशल साईटवर पडली होती. टूलकिटसह संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात असल्याचे दिल्लीचे पोलिस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी सांगितले आहे. 

वाचा : महागाईचा भडका! पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलेंडर महागला

कटात सामील असलेले लोक खलिस्तान समर्थक असून ते पोएटिक जस्टिस फाउंडेशनशी संबंधित असल्याचा संशय आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर टूलकिटचा कट विचारपूर्वकपणे रचण्यात आला होता, असेही पोलिसांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात पोलिसांनी गुगल तसेच इतर सोशल मीडिया कंपन्याकडून 'टूलकिट' बनविण्याशी संबंधित ईमेल आयडी, डोमेन यूआरएल व काही सोशल मीडिया खात्यांची माहिती मागविली होती. टूलकिटमध्ये ट्विटरच्या माध्यमातून कोणत्याही मोहिमेला ट्रेंड करण्यासाठी आवश्यक ते दिशानिर्देश जारी केलेले असतात. टूलकिट प्रकरणी पोलिसांनी 4 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला होता. 

वाचा : आता केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाणे आवश्यक 

निकिता जेकब ह्या मुंबई येथील असून त्या एक कार्यकर्ती आणि वकील आहे. तर शंतनू हे देखील एक कार्यकर्ते आहेत.

तर पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवीवर टूलकिट एडिट करुन त्यात बदल केल्याचा आरोप आहे. तिला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.