Sun, Sep 20, 2020 09:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरोना लसीबाबत 'एम्स'चा मोठा खुलासा! 

कोरोना लसीबाबत 'एम्स'चा मोठा खुलासा! 

Last Updated: Jun 06 2020 8:30PM

File Photoनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोना लसीबाबत महत्वाची माहिती दिली आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत कोरोना लस तयार होण्याची शक्यता आहे. कोरोनावर लस वर्षाच्या अखेरीस अथवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला देखील येऊ शकते, असे डॉ. गुलेरिया यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

जर कोरोनावर लस या वर्षाच्या अखेरीस तयार नाही झाली तर ती पुढील वर्षाच्या सुरुवातीला लस निश्चितच तयार होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाबाबतही वक्तव्य केले आहे. या औषधाबाबत अधिक संशोधन केले जात आहे. आतापर्यंत जो डेटा मिळाला आहे त्यानुसार हे औषध लाभदायक आहे. हे सुरक्षित औषध आहे. या औषधाचे साईड इफेक्ट अधिक नाहीत. ज्यांनी हे औषधे घेतले आहे त्यांना कोरोनाची लक्षण कमी जाणवली. पण कोणत्याही ठाम निर्णयावर पोहोचू नये. मात्र, दिलासादायक बाब ही आहे की डब्ल्यूएचओने आपल्या आकडेवारीचा आढावा घेतल्यानंतर यावर क्लिनिकल ट्रायल पुन्हा सुरु केले आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण कमी आहे. ही सकारात्मक गोष्ट आहे. कोरोनाचे आकडे काही प्रमाणात वाढू शकतात. कारण आपली लोकसंख्या अधिक आहे. लॉकडाऊन शिथिल होत असताना आपली जबाबदारी वाढत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 

 "