Sat, Aug 15, 2020 13:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडीत धोकादायक इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू (video)

भिवंडीत इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू (video)

Published On: Aug 24 2019 8:07AM | Last Updated: Aug 24 2019 12:03PM
भिवंडी : पुढारी ऑनलाईन 

भिवंडी शहरातील पिराणीपाडा शांतीनगर येथील एक धोकादायक इमारत कोसळली. सुरवातीला या इमारतीला तडा गेल्यानंतर इमारतीतील लोकांना इमारती बाहेर काढत असतानाच इमारत कोसळली. यामध्ये २ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत ५ जण गंभीर जखमी तर २ जण किरकोळ जखमी झाले आहेत. 

त्यामुळे इमारतीमध्ये काही जण अडकल्याची भिती व्यक्त होत आहे. घटनास्थळी आपत्कालीन कक्ष, अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले आहेत. बचावकार्य सुरू आहे.