Mon, Nov 30, 2020 13:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'तिचा' साडीतील लूक पाहून लोक म्हणाले, 'हा ब्लाऊज आहे की ब्रा?

'तिचा' साडीतील लूक पाहून लोक म्हणाले, 'हा ब्लाऊज आहे की ब्रा?

Last Updated: Jun 27 2020 6:13PM

प्रातिनिधीक फोटोमुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवुड अभिनेत्री अनेकदा चाहत्यांना आपल्या बोल्ड लुकने क्लीन बोल्ड करत असतात. प्लंजिंग नेकलाइन टॉप आणि गाउन्स , ते थाई हाय स्लिट आणि बॅकलेस ड्रेसेस मध्ये त्या कहर करतात. या अभिनेत्री साडीतही बोल्ड राहतात. त्यासाठी असे ब्लाऊज निवडतात ज्यात बऱ्याचदा सोशल मीडियावर लोक 'हे ब्लाउज घातले आहे की ब्रा?' अशा कमेंट करताना दिसतात.

NBT

वाचा : सुशांतने आत्महत्येचा दोनवेळा केला प्रयत्न?

सध्या बिकिनी कट ब्लाउज ट्रेंडमध्ये आहे. या ब्लाऊजच्या नावानुसार हे ब्लाउज बिकिनी ब्राच्या आकारात कट आणि स्टिच केलेले असतात. ही स्टाईल मनीष मल्होत्राची आहे. करीना कपूर, जानवी कपूर आणि भूमी पेडणेकर, तारा सुतारिया या अभिनेत्रीही या ब्लाउजमध्ये दिसत आहेत. 

NBT

सिक्वल साडीशी मनीष मल्होत्राचे अॅटॅचमेंट खूप जुने आहे. या पॅटर्नला तो प्रत्येकवर्षी नव्या डिझानमध्ये घेऊन येतो. २०१९ मध्ये त्याने शीटेड सीक्वेंस साडी कलेक्शन लॉन्च केली होती. या साड्या जॉर्जेट मटेरियलवर बनविल्या गेल्या आहेत. यासह डिझायनरने ब्लाऊजला बिकीनी ब्रा स्टाईलमध्ये ठेवले होते. करीना कपूरला या स्टाईलच्या साडीमध्ये एका डान्स शो मध्ये पाहिले गेले होते. तिने त्यासह मॅटलिक पिंक कलरचा ब्लॉऊज घातला होता. करीनाने याबरोबर दोन लेअरचे डायमंडही मॅच केले होते. 

NBT

भूमी पेडणेकर या साडीमध्ये बऱ्याचवेळी दिसली आहे. तिने ब्लॅक, व्हॅाईट, ऑरेंज, आमि मरुन सीक्वंस वर्क साडीमध्ये स्पॉट फोटोग्राफी केले होते. यासह तिने सेक्सी ब्लॉऊज परिधान करुन लुक हॉट बनवला होता. भूमीचा हा लूक पाहून ' तिने ब्रा बरोबर साडी परिधान केली आहे का अशा कमेंट लोकांनी केल्या होत्या.  

NBT

तारा सुतारिया बोल्ड लुकींगसाठी प्रसिध्द आहे. तिनेही ग्रे कलरची साडी निवडली. तिने ही साडी बच्चन यांच्या घरी दिपावली पार्टीमध्ये परिधान केली होती. जान्हवी कपूर आणि जॅकलिन फर्नाडीसचाही या लिस्टमध्ये समावेश होतो. जे साडी बरोबर ब्लॉऊज परिधान स्पॅाट आल्या आहेत. कपूर घराण्यातील लाडकीने लव्हेंडर कलरची साडी परिधान केली होती. तर जॅकलीनने येलो कलरची साडी परिधान केली होती. 

वाचा : करण जोहर इम्रान हाश्मीला सुशांत सिंह राजपूतबद्दल 'तो' प्रश्न विचारतो आणि...