Tue, Sep 29, 2020 08:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुख्यमंत्र्यांकडून कोविड योद्ध्यांचे कौतुक

मुख्यमंत्र्यांकडून कोविड योद्ध्यांचे कौतुक

Last Updated: Aug 15 2020 11:55AM

ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्र्यांनी कोविड योद्धे, डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय सहायक तसेच कोरोनावर मात केलेल्या नागरिकांना भेटून त्यांचे कौतुक केले.मुंबई : पुढारी ऑनलाईन

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण केले. यावेळी रश्मी ठाकरे उपस्थित होत्या.

ध्वजारोहण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोविड योद्धे, डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय सहायक तसेच कोरोनावर मात केलेल्या नागरिकांना भेटून त्यांचे कौतुक केले. मंत्रालयात ध्वजारोहण झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
 

 "