Wed, Oct 28, 2020 11:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ब्रेकिंग! बच्चन घराण्यात कोरोनाचा शिरकाव; ऐश्वर्या आणि मुलगी आराध्याही पॉझिटिव्ह

ब्रेकिंग! बच्चन घराण्यात कोरोनाचा शिरकाव; ऐश्वर्या आणि मुलगी आराध्याही पॉझिटिव्ह

Last Updated: Jul 12 2020 3:08PM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी ऑनलाईन

महानायक अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आता त्यांची सून ऐश्वर्या आणि नात आराध्याही कोरोना पॉझिटिव्ह आली आहे.बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर करण्यात आलेल्या कोरोना टेस्टमध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि ऐश्वर्या अभिषेकची मुलगी आराध्याही कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र, जया बच्चन व इतर नातेवाईक मात्र निगेटिव्ह आल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली.

अधिक वाचा : ब्रेकिंग! बच्चन घराण्यात कोरोनाचा शिरकाव; ऐश्वर्या आणि मुलगी आराध्याही पॉझिटिव्ह

दुसरीकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून ऐश्वर्या आणि आराध्या कोरोना पॉझिटिव्हच्या वृत्ताला दुजोरा दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, श्रीमती ऐश्वर्या राय बच्चन व कन्या आराध्या बच्चन या देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. श्रीमती जया बच्चन यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. बच्चन कुटुंबियांची तब्येत तंदुरुस्त व्हावी अशी आमची सदिच्छा आहे.

अधिक वाचा : अभिनेते अनुपम खेर यांच्या आई, भावासह चौघे पॉझिटिव्ह

शतकाचे महानायक अमिताभ बच्चन यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमिताभ बच्चन यांना अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी स्वत:ची वैद्यकीय तपासणी करवून घेतली होती. त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून, त्यांनी स्वत:च ट्विटरवरून आपल्याला कोरोना झाला असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, अभिषेक बच्चनचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. अमिताभ यांच्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

अधिक वाचा : ‘बिग बीं’च्या प्रकृतीविषयी डॉक्टरांची नवी माहिती...

यापूर्वीही लीलावती रुग्णालयात ते वरचेवर तपासणी आणि उपचारासाठी जात होते. मध्यंतरी एकदा रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. अमिताभ बच्चन यांना गेल्या काही दिवसांपासून घशाचा आणि मणक्याचा त्रास आहे. वेदना असह्य झाल्याने त्यांना तेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवळपास 4 तास रुग्णालयात दाखल राहिल्यानंतर त्यांना घरी जाण्यास परवानगी देण्यात आली होती. गतवर्षी ‘कौन बनेगा करोडपती’दरम्यान त्यांना गळ्यात त्रास उद्भवला होता. नंतर ते लगेचच ‘लीलावती’त गेले होते. या दुखण्यामुळे ते ‘लीलावती’त अधूनमधून तपासणीसाठी जात असत.

अधिक वाचा : अमिताभ, अभिषेक बच्चन कोरोनाबाधित

‘कुली’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पुनीत इस्सरचा ठोसा वर्मी लागल्याने घडलेल्या मोठ्या अपघातातून एकदा ते बचावले होते. बरेच दिवस तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल राहावे लागले होते. दरम्यान, एकदा त्यांच्या आरोग्याची स्थिती ‘क्रिटिकल’ही बनली होती. अवघ्या देशात ते बरे व्हावेत म्हणून यज्ञ, विशेष प्रार्थना झाल्या होत्या.

अभिषेक बच्चनही बाधित

रात्री 10 वाजून 52 मिनिटांनी बच्चन यांनी स्वत: ते बाधित असल्याचे स्पष्ट केले. गेल्या 10 दिवसांत जे जे लोक माझ्या संपर्कात आलेत, त्यांनी स्वत:ची चाचणी कृपया करून घ्यावी, असे कळकळीचे आवाहनही महानायकाने या पोस्टमध्ये केले आहे. बच्चन कुटुंबीयांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत, त्यांचे अहवाल अद्याप यायचे आहेत. दरम्यान, अमिताभ यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, तसेच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे आणि महानायकाने त्वरित बरे व्हावे म्हणून प्रार्थना केली आहे. नानावटी रुग्णालयात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

अधिक वाचा : अमिताभ बच्चन यांच्यानंतर अभिषेकही कोरोनाबाधित!

अधिक वाचा : सुरक्षारक्षक कोरोनाग्रस्त झाल्याने अभिनेत्री रेखा यांचा बंगला सील!

 "