Mon, Nov 30, 2020 14:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अमिताभ बच्चन यांना रूग्णालयातून डिस्चार्ज

अमिताभ बच्चन यांना रूग्णालयातून डिस्चार्ज

Last Updated: Oct 19 2019 8:55AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांना शुक्रवार रात्री रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रूटीन चेकअपसाठी त्यांना मुंबईच्या एका रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.  

७७ वर्षीय अमिताभ बच्चन यांना बुधवारी अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री डिस्चार्ज होण्याआधी २ दिवस रूग्णालयात दाखल होते. शुक्रवारी रात्री १० वाजता रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अमिताभ आपली पत्नी जया बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चनसोबत घरी गेले. 

बिग बी यांनी यापूर्वी सांगितले होते की, आपले यकृत केवळ २५ टक्के कार्यरत आहे. बच्चन यांना १९८२ मध्ये कुली चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दुखापत झाली होती. तेव्हापासून त्यांना यकृताचा त्रास जाणवू लागला आणि त्यांचे यकृत ७५ टक्के काम करत नव्हते. ज्यावेळी बिग बी यांना दुखापत झाली होती तेव्हा त्यांना चुकीने 'हेपेटाइटिस बी'ने ग्रस्त रुग्णांचे रक्त चढविण्यात आले होते.

बिग बी यांनी ११ ऑक्टोबर रोजी ७७ व्या वर्षात पदार्पण केले. गेल्या महिन्यात त्यांना मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला होता.