Tue, Sep 29, 2020 20:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत मुसळधारेने उपनगरीय रेल्वेची वाहतूक खोळंबली, मालाड जवळ दरड कोसळली  (video)

मुंबईत मुसळधारेने रेल्वे वाहतूक खोळंबली (video)

Last Updated: Aug 04 2020 11:56AM
मुंबई : पुढारी  वृत्तसेवा

दडी मारून बसलेल्या पावसाने मुंबई आणि उपनगरात सोमवार रात्रीपासून दमदार हजेरी लावली. त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्याने लोकलची वाहतूक बंद करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या  परेल, हार्बरवर वडाळा  तर पश्चिम रेल्वेच्या प्रभादेवी  स्थानकात पाणी भरले असल्याने वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कामावर जाणाऱ्यांचे हाल झाले. 

पश्चिम रेल्वेच्या प्रभादेवी ते  दादर स्थानक दरम्यान रेल्वे ट्रॅकवर  200 मिमी  पाणी आले आहे. परिणामी रेल्वेने दादरला लोकलची वाहतूक थांबवली आहे. बांद्रा ते  डहाणू रोड मार्गावर लोकल धावत असून बांद्रा ते चर्चगेट लोकल वाहतूक ठप्प  आहे. 

मध्य रेल्वेवर मेन लाईनवर परेल स्थानकात पाणी साचले असल्याने सीएसटीएम ते ठाणे लोकल बंद आहे. ठाणे ते कल्याण, कसारा, कर्जत लोकल वाहतूक सुरु आहेत. हार्बर मार्गांवर वडाळा येथे रेल्वे रुळावर पाणी आले आहे. परिणामी सीएसटीएम ते वाशी सेवा बंद करण्यात आली आहे. प्रवाशांकरिता वाशी ते पनवेल दरम्यान लोकल सेवा धावत आहेत. 

हिंदमाता, दादर, कुर्ला आणि शहरातील अनेक सखल भागात पाणी भरल्याने बसच्या मार्गात देखील बदल करण्यात आला आहे. 

मालाड सबवे पाणी साचल्याने बंद करण्यात आला आहे. मालाड जवळ दरड कोसळल्याने महामार्ग बंद करण्यात आला आहे. येथे एकेरी वाहतूक केल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

मुंबईतील सर्वाधिक पाऊस (मिलिमीटरमध्ये) 
शहर -229.8 मिमी
दादर- 329
मलबार हिल- 302
वरळी- 300
कुलाबा- 236
पालिका मुख्यालय- 285
डोंगरी- 243 
मेमनवाडा- 269
ब्रिटानिया - 261
चंदनवाडी - 243 
ग्रँट रोड- 276
नायर हॉस्पिटल- 276 
भायखळा- 246
रावळी कॅम्प- 267
धारावी- 264
हाजीअली- 220
पश्चिम उपनगर -193.5 
अंधेरी- 240 
मरोळ- 240 
सांताक्रूझ- 232
अंधेरी पश्चिम- 258 
कूपर हॉस्पिटल- 202
वेसावे- 210 
गोरेगाव- 243 
बोरिवली- 251 
दहिसर-267
पूर्व उपनगर- 179.4
कुर्ला- 237
चेंबूर- 245 
घाटकोपर- 223
विक्रोळी- 222

 

 "