Wed, Aug 12, 2020 00:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'युजीसी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार का'?

'युजीसी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार का'?

Last Updated: Jul 13 2020 4:42PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

सद्यस्थितीत परिक्षा घेऊ शकत नाही असा पुनरुच्चार उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. आम्ही परीक्षाच घेणार नाही अस कधीही म्हटलेलं नाही असेही त्यांनी नमूद केले. सद्यस्थितीत अंतिम वर्षाच्या परिक्षा घेऊ शकत नसल्याचे ते म्हणाले. आम्ही आमची भूमिका बदलली नसून आम्ही ठाम असल्याचे सामंत म्हणाले. वाईन शॉप आणि विद्यापीठ परिक्षांची तुलना चुकीची असल्याचे ते म्हणाले. 

अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी विद्यार्थ्यांनी अभ्यासच करू नये असा सल्ला मी मंत्री म्हणून देणार नाही. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी परीक्षा न घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने राज्यात घेतल्याचे ते म्हणाले. 

अधिक वाचा  : 'ऑपरेशन कमळ महाराष्ट्रात चालणार नाही' 

एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्याही आम्ही विचार केला असून त्या संदर्भात अहवाल आपल्याकडे प्राप्त झाल्याची माहिती सामंत यांनी दिली. कुलगुरूंनी एटीकेटी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि भविष्याचा नक्की विचार केला असल्याचे  मंत्री सामंत यांनी  सांगितले. विद्यार्थी आणि पालकांचा परिक्षा घेण्याला विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. 

अधिक वाचा : तर देशाला जबर किंमत मोजावी लागणार!

कोरोना  संकट दूर गेल्यानंतर आम्ही परिक्षा घेण्यासाठी आम्ही तयार आहोत. युजीसीपेक्षा राज्य सरकार अधिक अधिकार आहेत. युजीसीला दिलेल्या पत्रात आम्ही बदल केलेला नाही असेही त्यांनी सांगितले. 

अधिक वाचा : दूरसंचार कंपन्यांना दणका; प्रीमियम योजनांना 'ट्राय'ने लावला लगाम!

परिक्षा कशा घेणार आहोत ? 

दिवसेंदिवस राज्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये परीक्षा घेणे हे लाखो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने व्यवहार्य नाही.
तर बहुतांश कॉलेज, शैक्षणिक संस्था, हॉस्टेल हे क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरण्यात येत आहेत. तेथे आपण परिक्षा कसे घेणार आहोत हे ही यूजीसीने सांगावे असे सामंत यांनी म्हटले आहे. 

डॉ.पटवर्धन यांनी राज्यातील स्थिती केंद्राला अवगत करून द्यावी 

तसेच यावेळी त्यांनी यूजीसीचे उपाध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन यांनी एका मुलाखतीत राज्यात दारूची दुकाने सुरू केली जातात मग परिक्षा का घेतली नाही असे राज्य सरकारला विचारले होते. त्यांच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना सामंत म्हणाले, डॉ.भूषण पटवर्धन यांच्या या वक्तव्याशी मी सहमत नाही. तसेच वाईन शॉप आणि परिक्षा यांची तुलना करणे हे चुकिचे आहे. डॉ. पटवर्धन हे नक्कीच केंद्रात काम करतात पण त्या आधी ते या राज्याचे आहेत. त्यामुळे त्यांनी केंद्रात आणि यूजीसीला राज्यातील स्थिती अवगत करून द्यायला हवी. असे सामंत यांनी म्हटले आहे. 

विद्यार्थ्यी हिताचा विचार करावा

कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेता येत नसल्याने  अनेक विद्यार्थी हे आपल्या गावी गेले आहेत. या संकंट काळात परिक्षा घेतल्यास गावावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे शक्य आहे का? परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. या शक्याता लक्षात घेऊनच पंजाब, हरियाणा, राजस्थान, उडिसा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांनी तसेच आयआयटीने अंतिम परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतल्याचे सामंत यांनी सांगितले. त्यामुळे यूजीसीने या महामारीच्या काळात विद्यार्थी हा घटक केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्याच्या स्वास्थ, भवितव्य आणि हिताचा विचार करून अंतिम निर्णय घ्यावा असेही म्हटले आहे.