Wed, Aug 12, 2020 00:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्थलांतरित मजुरांचा प्रश्न हाताळण्यास पश्चिम बंगालला अपयश : हायकोर्ट

स्थलांतरित मजुरांचा प्रश्न हाताळण्यास पश्चिम बंगालला अपयश : हायकोर्ट

Last Updated: Jul 14 2020 10:12PM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा 

कोविडच्या महामारीत पश्चिम बंगालला स्थलांतरित मजुरांचा प्रश्न योग्य प्रकारे हाताळता आला नाही. एवढेच काय तर तेथील सरकारने काही मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्याची सोयही केलेली नाही, अशा शब्दांत मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांनी नाराजी व्यक्त केली.

मजूरांना आपल्या गावी पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रातून विशेष रेल्वे तसेच बसेस सोडण्यात येत आहेत. मात्र रेल्वे आणि बसेससाठी परप्रांतीय मजूरांनी मागितलेल्या परवानगी बाबत त्यांना कोणतीही माहिती दिली जात नाही. या गाड्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या मजुरांना ठेवण्यात आलेल्या शेल्टरर्समध्ये पुरेशी व्यवस्था नाही एवढेच काय तर रेल्वे किंवा बसमध्ये जाईपर्यंत मजुरांना अन्न आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात येत नसल्याचा दावा करत सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सिटू)च्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. 

त्यावेळी याचिकाकर्त्यांनी कोर्टाला सांगितले की अद्यापही परप्रांतीय मजूर महाराष्ट्रात अडकले आहेत यावर राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोनी यांनी बाजू मांडताना कोर्टाला सांगितले की या प्रकरणी आणखी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. हायकोर्टाने हा युक्तिवाद ऐकून घेत सुनावणी तहकूब केली.