Mon, Nov 30, 2020 12:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सीएम उद्धव ठाकरेंनी धारावीत करून दाखवलं! थेट जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुकाची थाप!

सीएम उद्धव ठाकरेंनी धारावीत करून दाखवलं! थेट जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुकाची थाप!

Last Updated: Jul 12 2020 1:33AM

संग्रहित छायाचित्रजिनिव्हा : पुढारी ऑनलाईन

धारावी ही आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी आहे. हा झोपडपट्टी परिसर सुरुवातीला कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. मात्र, आता येथील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला आहे. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली आहे. जिनिव्हामध्ये एका पत्रकार परिषदेत जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी धारावी मॉडेलचे कौतुक केले. त्यांनी भारताचा उल्लेख करत मुंबईतील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेली धारावी येथील कोरोना परिस्थिती कशी नियंत्रणात आली, याबद्दल सांगितले. 

टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस म्हणाले की इटली, स्पेन, साऊथ कोरिया आणि भारताच्या सर्वांत मोठ्या झोपडपट्टीने दाखवून दिले आहे की, धोकादायक असलेल्या कोरोना विषाणूवर कशाप्रकारे नियंत्रण मिळवले जाऊ शकते. ते म्हणाले, मागील ६ आठवड्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. अनेक उदाहरणे अशीही आहेत की, जिथे कोरोना गतीने पसरला. परंतु, तरीही येथे कोरोनावर नियंत्रण मिळवता आले. मुंबईतील धारावी अधिक लोकसंख्या असलेले ठिकाण आहे. तेथे टेस्टिंग, ट्रेसिंग, आयसोलेशन आणि उपचार या गोष्टींवर भर देऊन कोरोनाची साखळी तोडण्यास यश आले आहे. 

जगभरात १८० हून अधिक देश कोरोना बाधित आहेत. आतापर्यंत १.२२ कोटींहून अधिक लोक कोरोना संक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. जगभरात ५.५ लाखांहून अधिक लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. 

भारतातील कोरोना रूग्णांचा आकडा ८ लाख २० हजारांवर  

देशातील आकडा ८ लाख २० हजार ९१६ वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत ५ लाख १५ हजार ३८६ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या २ लाख ८३ हजार ४०७ जणांवर उपचार सुरू असून आतापर्यंत कोरोनामुळे २२ हजार १२३ जणांचा बळी गेला आहे. 

वाचा-  चिंताजनक! कोरोनामुळे एका दिवसात ५१९ जणांचा बळी