Thu, Oct 29, 2020 07:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्र दिली खोटी माहिती?

उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्र दिली खोटी माहिती?

Last Updated: Sep 20 2020 10:32AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार एका माहिती अधिकार (RTI) कार्यकर्त्याने निवडणूक आयोगाकडे केली आहे. यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) यांना तिघा नेत्यांची निवडणूक प्रतिज्ञापत्रांची पडताळणी करण्याची विनंती केली आहे. याबाबत एका इंग्रजी दैनिकाने वृत्त प्रसिद्ध केले आहे.

या संदर्भात महिनाभरापूर्वी तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन कर मंडळाने सीबीडीटीला फेरपडणताळणीची विनंती केली आहे. त्याबाबत स्मरणपत्रही पाठवण्यात आले आहे. ठाकरे पिता-पुत्र व सुप्रिया सुळे यांच्या प्रतिज्ञापत्रातील ताळेबंदाची फेरपडताळणी करावी, असे कर मंडळाने म्हटले आहे.

वृत्तानुसार, RTI कार्यकर्त्याकडून CBDT कडे विचारणा करण्यात आली आहे की, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात जाहीर केलेल्या मालमत्ता आणि कर्जाची पडताळणी करा. “यासंदर्भात महिनाभरापूर्वी निवडणूक आयोगाकडे तक्रार आली होती. याबाबत एक स्मरणपत्रही पाठविण्यात आले होते,” असे आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

 "