मुंबई : विशेष प्रतिनिधी
आम्ही खासदार उदयनराजे भोसले कोणताही अपमान केलेला नाही. आम्हाला काही गोष्टी त्यांच्याकडून अपेक्षीत आहेत. आपल्या माणसांकडून अपेक्षा करणे हे आपले काम आहे. त्यामध्ये काहीही चुकीचे नाही, असे शिवसेेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेचे मुखपत्र सामनातून सोमवारी उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश आणि त्यांच्या कॉलर उडविण्याच्या स्टाईलवरुन बोचरी टीका करण्यात आली होती. या टीकेचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे यांचे समर्थन करताना उदयनराजेंची तरुण वर्गात के्रझ असून त्यांच्या कॉलर उडविण्याच्या स्टाईलबाबत कोणताही आपेक्ष नसल्याचे स्पष्ट केले. उध्दव ठाकरे यांनी सामनातील अग्रलेखातून उदयनराजे भोसले यांचा कोणताही अपमान केला नसल्याचे स्पष्ट केले.
ते म्हणाले, सामनातील आग्रलेखात मराठीतून व्यवस्थितपणे मांडण्यात आले आहे. त्यांचा अपमान करण्याच्या हेतूने नाही तर त्यांच्याकडून काही अपेक्षा असल्यामुळे मत मांडले आहे.