Wed, Oct 28, 2020 11:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘योगीजी, पोलिसांची तातडीने चौकशी करा’

योगीजी, पोलिसांची तातडीने चौकशी करा; सुप्रिया सुळे आक्रमक

Last Updated: Oct 01 2020 5:09PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांनी तातडीने चौकशी करावी अशी मागणी केली आहे. 

राहुल गांधी यांना यमुना एक्सप्रेस वेवर उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की झाली. हे अतिशय निंदाजनक आहे. या घटनेचा मी जाहीर निषेध करते. असे म्हणत खा. सुप्रिया सुळे यांनी राहुल गांधी यांच्या अटकेवर संताप व्यक्त केला. 

कुठल्याही राज्याचे प्रशासन असू दे, बलात्कारासारखी लाजिरवाणी घटना घडल्यावर प्रशासनाने फास्टट्रॅक पद्धतीने ॲक्शन घेतली पाहिजे. ती व्हावी या मागणीसाठी संसद सदस्य असलेले राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबाला भेटायला जात होते. पण त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. अशी खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. 

तसेच, ज्या ठिकाणी युपी सरकारकडून दडपशाही होणार असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करते. पोलिसांनी न्याय मागणीसाठी जाणाऱ्या लोकप्रतिनिधी वा कुठल्याही व्यक्तीची कॉलर धरणं कितपत योग्य आहे, असा सवाप उपस्थित करत याचा न्याय मी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडे मागते आहे. असे सुळे यांनी म्हटले आहे. 

 "