Mon, Apr 12, 2021 02:14
टायगरने शर्टलेस फोटो शेअर करून लावली आग, दिशा पटानीने पाहिल्यानंतर...

Last Updated: Apr 07 2021 5:30PM

मुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेत्री टायगर श्रॉफ किती फिटनेस फ्रिक आहे, हे सर्वश्रृत आहे. तो आपल्या फिटनेसकडे खूप लक्ष देतो. त्याने आपले वर्कआऊटचे फोटो शेअर केले होते. आता त्याने आपला शर्टलेस फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो बीचवर उभारलेला दिसत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर मात्र, दिशा पटानी घायाळ झाली आहे. 

फोटोमध्ये टायगर बीचवर साईड पोज देताना दिसत आहे. यामध्ये त्याचे फुल सिक्स पॅक्स दिसत आहेत. टायगरने पिंक ॲण्ड ब्लॅक कलर शॉर्ट्स आणि गॉगल घातला आहे. टायगरने पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'तुम्ही बीचविषयी विचार केला?' यासोबतचं त्याने मासा, समुद्राच्या लाटा आणि सूर्याचे इमोजी तसेच रेड हार्ट इमोजीदेखील दिली आहे. हा फोटो आतापर्यंत १२ लाखांहून अधिक वेळा लाईक करण्यात आला आहे. 

वाचा - अनुष्काने दाखवली विराटला ताकद; व्हिडिओ व्हायरल

दिशा पटानी घायाळ 

टायगरची गर्लफ्रेंड दिशा पटानीने फायर इमोजी देऊन त्याचा फोटो शेअर केला आहे. टायगरच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. एका फॅनने कमेंट करून लिहिलंय की, ''हॉटी मॅन लव्ह यू.' टायगर लवकरचं ॲक्शन थ्रिलर गणपत मध्ये दिसणार आहे. यामध्य़े कृती सेनॉनची मुख्य भूमिका आहे. 

वाचा - आई कुठे काय करते फेम ईशा- विमलचा रॉयल लूक (video)