Sun, Aug 09, 2020 13:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'रेल्वे डब्यात आयसीयूची सुविधा नाहीच'!

'रेल्वे डब्यात आयसीयूची सुविधा नाहीच'!

Last Updated: Jul 02 2020 9:11PM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोरोना रुग्णांना उपचारासाठी जागा अपुरी पडू नये म्हणून रेल्वे डब्यात क्वारंटाईन युनिट उभारता येईल. परंतु, रेल्वेत आयसीयूची सुविधा देणे शक्य नाही. तशी सुविधा द्यायची झाल्यास डब्यात मोठ्या प्रमाणात योग्य ते बदल करावे लागतील, अशी माहिती सेंट्रल रेल्वेच्या वतीने उच्च न्यायालयात देण्यात आली. 

पालघर : जव्हारच्या काळमांडवी धबधब्यात ५ मुले बुडाली

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी उपलब्ध असलेली वैद्यकीय यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे बंद केलेली रुग्णालये आणि नर्सिंग होम पुन्हा सुरू करण्यात यावेत. तसेच रुग्णांच्या उपचारासाठी जागा अपुरी पडू नये म्हणून रेल्वेच्या डब्यात आयसीयू युनिटसह आयसोलेशन कक्ष तयार करण्यात यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते नरेश कपूर यांच्यावतीने अ‍ॅड. प्रेरक चौधरी आणि अ‍ॅड. जिगर कामदार यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. त्या याचिकेवर मुख्य न्यायामूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायामूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर  व्हिडीओ कॉन्फरन्स मार्फत सुनावणी झाली. 

यावेळी मध्य रेल्वेचे मुख्य रोलिंग स्टॉक अभियंता रुपेश कोहली यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून केवळ कोरोनाची अल्प लक्षणे असणार्‍या संशयितांना किंवा आयसोलेशन करण्यापुरतीच रेल्वे डब्यात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. नॉन एसी कोचमध्ये आयसीयूची सुविधा देणे सध्या तरी शक्य नाही. या डब्याचा वापर काही कालावधी नंतर पुन्हा प्रवाशी वाहतुकीसाठी केला जाणार असल्याची माहिती न्यायालयाला दिली. याची दखल घेत न्यायालयाने याचिका निकाली काढली.

अधिक वाचा : 'कारागृहात आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करा'

८९२ कोचेसचे आयसोलेशनमध्ये रूपांतर

कोरोना रुग्णांना जागा अपुरी पडू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने युध्द पातळीवर काम हाती घेतले असून ८९२ डब्यांचे कोविड आयसोलेशन सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. त्यापैकी मध्य रेल्वेने ४८२ डबे तर पश्चिम रेल्वेने ४१० डब्यात तात्पुरते बदल केले आहेत.

अधिक वाचा : सप्टेबरपर्यंत कोरोनाची साथ आटोक्यात येईल : डॉ. तात्याराव लहाने (video)