Sun, Aug 09, 2020 13:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राजीव गांधी फाउंडेशनच्या फंडिंगची केंद्र सरकारकडून चौकशी 

राजीव गांधी फाउंडेशनच्या फंडिंगची केंद्र सरकारकडून चौकशी 

Last Updated: Jul 08 2020 11:46AM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

राजीव गांधी फाउंडेशनच्या फंडिंगवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असतानाच आता केंद्र सरकारने या फाउंडेशनला कोठून कोठून पैसा प्राप्त होतो, याची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. सक्तवसुली संचालनालयाचे विशेष सचिव या चौकशी समितीचे प्रमुख असणार आहेत.

अधिक वाचा :  बांगला देशातून महाराष्ट्रात येणार 'रेमडेसिवीर'

फाउंडेशनला होणारे फंडिंग, झालेले नियमांचे उल्लंघन आदी बाबींची चौकशी या समितीकडून केली जाणार असल्याची माहिती गृह मंत्रालयातील सूत्रांनी बुधवारी दिली. गृह मंत्रालयाने एका आंतरमंत्रालयीन समितीची स्थापना केली असून ही समिती राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट तसेच इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टची चौकशी करणार आहे.

अधिक वाचा :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहाची अज्ञातांकडून तोडफोड! (video)

पीएमएलए अर्थात हवाला प्रतिबंधक कायदा, आयकर कायदा, एफसीआरए कायद्याचे उल्लंघन करण्यात आले नाही ना, याची सखोल चौकशी ईडीचे विशेष संचालक करतील. भारत आणि चीन यांच्यादरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीका केल्यानंतर भाजपने राजीव गांधी फाउंडेशनच्या फंडिंगचा मुद्दा उपस्थित करीत प्रती हल्ला केला होता. 

अधिक वाचा :  पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, नागरिकाचा मृत्यू

फाउंडेशनला चीनकडून मोठ्या प्रमाणावर फंडिंग होत असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला होता. देशातील आपत्कालीन संकटासाठी जो पंतप्रधान मदतनिधी बनविण्यात आला होता, त्या निधीतील पैसादेखील राजीव गांधी फाउंडेशनला देण्यात आल्याची बाब नड्डा यांनी चव्हाट्यावर आणली होती. तत्कालीन संपुआ सरकारच्या कार्यकाळात २००५ ते २००८ दरम्यान पंतप्रधान मदतनिधीचा पैसा राजीव गांधी फाउंडेशनला देण्यात आल्याचा आरोप भाजपने केला होता.