Sun, Aug 09, 2020 14:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात १५०३, तर मुंबईत ९६९ नवे रुग्ण

ठाण्यात १५०३, तर मुंबईत ९६९ नवे रुग्ण

Last Updated: Jul 15 2020 1:40AM
मुंबई/ठाणे : पुढारी वृत्तसेवा

मंगळवारी राज्यभरात कोरोनाच्या  6741 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे आतापर्यंतची बाधितांची संख्या 2 लाख 67 हजारांवर पोहोचली आहे. सध्या राज्यात 1 लाख  7 हजार 665 रुग्णांवर (अ‍ॅक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मुंबईमधील कोरोना रुग्णांमध्ये घट होत असताना ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णात चिंताजनक वाढ होत आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या घट असलेल्या ठाणे जिल्ह्यात मंगळवारी 1503 नवे रुग्ण सापडले. उपचार घेत असताना 35 रुग्ण दगावले आहेत.  

मुंबईनंतर ठाणे जिल्ह्यात  कोरोनाग्रस्तांची संख्या 58 हजार 507 वर पोहचली असून मृतांचा आकडा 1 हजार 689  झाला आहे.  पुन्हा कल्याण पेक्षा ठाण्यात जास्त रुग्ण सापडू लागली आहेत. ठाण्यात 344 तर कल्याण डोंबिवलीत 336  रुग्ण सापडले असून दोन्ही शहरात प्रत्येकी 9 रुग्ण दगावले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे 34 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

मुंबईत मंगळवारी 969 नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा 94 हजार 863 वर पोहोचला आहे. 70 जणांचा मृत्यू झाला असून 1011 जण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5402 वर पोहचली आहे. तर हॉस्पिटलमध्ये आजही 22 हजार 828 रुग्ण उपचार घेत आहेत.