Fri, Oct 02, 2020 01:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तर विरोधी पक्षाला श्रीखंड पुरीचे जेवण घातले असते!

तर विरोधी पक्षाला श्रीखंड पुरीचे जेवण घातले असते!

Last Updated: May 27 2020 10:40AM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

राज्य कोरोनाच्या कचाट्यात अडकले असतानाही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजभवनात नेत्यांच्या वाढत्या फेरा, विरोधक आणि सत्ताधारी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. दरम्यान, भाजप नेते नारायण राणे यांनी राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी थेट राज्यपालांकडे जाऊन केली. त्यांच्या या मागणीमुळे राज्यातील राजकारणाला नवे वळण लागले. या सर्व घडामोडींचा सामनाच्या अग्रलेखातून  समाचार घेण्यात आला आहे. 

राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट करा ही मागणी केल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार अशा चर्चांना उधाण आलं. मात्र ही राष्ट्रपती राजवटची मागणी गुजरातमध्ये हिम्मत असेल, तर करून दाखवा असे आवाहन देत राऊत यांनी महाराष्ट्रात त्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. तसेच राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधत त्यांची तुलना गंजलेल्या तोफांशी केली. 

दोनेक वर्षापूर्वी मुंबईच्या राजभवनाखाली एक ब्रिटिशकालीन भूयार सापडले होते. त्यात काही जून्या गंजलेल्या तोफा साडलेल्यांचे सांगितले जाते. महाराष्ट्रातील सरकार पडणार असे आवाज त्या गंजलेल्या तोफातून काढावेत असे मनसुबे कोणी रचणार नयेत. जुन्या तोफा म्हणजे हवा पाण्याची नळकांडीच ठरतात. आणि राजभवनातील वातावरण गढूळ होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. 

तसेच, पुढील काही वर्षात १७० चे दोनशे झाले तर विरोधकांनी सरकारला दोष देऊ नये. विरोधकांचा दृष्टीकोण हा हिताचा आणि विधायक नाही. त्यामुळे विरोधकांना राज्यपालांनी खडेबोल सुनवायला हवेत. आणि त्यासाठी राज्याचे राज्यपाल हे सडेतोड आहेत. सध्या ज्या अधिकाराचा वापर करून राज्य अस्थिर करू पाहणाऱ्यांना राजभवनावर बोलावून त्यांचे कान उपटायला हवेत. अशा खास शब्दात विरोधकांवर राऊतांनी वाभाडे ओढले आहेत. 

यासोबत सत्ता अस्थिर आहे ठाकरे सरकार पडणार विरोधकांच्या या दाव्यांवरूनही राऊत यांनी कोपखळी मारली आहे. ठाकरे सरकार अकरा दिवस टिकणार नाही. असे बोलणाऱ्यांचे बारावे-तेरावे या सरकारने सहा महिन्यांचा टप्पा पूर्ण केला आहे. कोरोनाचे संकट नसते व सर्व काही अलबेल असते तर सरकारने सहा महिने पूर्ण केले या आनंदाप्रीत्यर्थ विरोधी पक्षाला श्रीखंड पुरीचे जेवण घातले असते. अशा खास शैलीत विरोधी पक्षाला कोपरखीळी मारत सध्या सरकारचे सर्व लक्ष कोरोनाच्या लढ्यावर असल्याचे राऊतांनी स्पष्ट केले.  

 "