Tue, Sep 29, 2020 10:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘सुशांत प्रकरणाचा राजकीय फायद्यासाठी वापर’

‘सुशांत प्रकरणाचा राजकीय फायद्यासाठी वापर’

Last Updated: Aug 09 2020 12:30PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचे सत्य लपवण्यासाठी बिहार आणि महाराष्ट्रातील नेत्यांनी हातमिळवणी केली असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 

खा. राऊत म्हणाले, सुशांतसिंह प्रकरणाचा राजकीय फायद्यासाठी काही लोकांकडून वापर केला जात आहे. हे घृणास्पद राजकारण आहे. मुंबई पोलिस हे उत्तम पोलिस दल आहे. मुंबई पोलिसांनी तपास पुर्ण केल्यानंतर त्याच्यावर ‘बोलणा-यांनी’ टिकाटिप्पणी करावी, असा खोचक सल्ला त्यांनी दिला.

बिहारचे डीजीपी एका पक्षाचे नेते होते. त्यांनी निवडणूक लढवली होती. अशा पोलीस अधिकाऱ्यापासून काय अपेक्षा करु शकतो. अशी टीका त्यांनी बिहार पोलिसांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की, सुशांत सिंह किती वेळा पटनाला गेला होता. सुशांतचं वैयक्तिक जीवन सार्वजनिक केलं जात आहे. चौकशीला वेगळी दिशा देण्याचं षडयंत्र सुरु आहे. या प्रकरणी महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात न घेता सगळं सुरू असल्याचा त्यांनी आरोप केला. 

 "