Mon, Sep 28, 2020 06:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अखेर प्रतीक्षा संपली; जगातील पहिल्या कोरोना लसीची होणार नोंदणी

जगातील पहिल्या कोरोना लसीची होणार नोंदणी

Last Updated: Aug 08 2020 11:56AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभर हाहाकार माजवला आहे. प्रत्येक देशातील संशोधक कोरोनावर लस काढण्यासाठी रात्र-दिवस काम करत आहेत. दरम्यान, दिलासादायक वृत्त समोर आले आहे. जगातील पहिल्या कोरोना लसीची नोंदणी रशियामध्ये होणार आहे, अशी माहिती रशियाचे आरोग्यमंत्री ओलेग ग्रिडनेव यांनी दिली आहे.

कोरोनावरील पहिल्या लसीची नोंदणी १२ ऑगस्ट रोजी होणार आहे. अशी दिलासादायक माहिती देत सध्या कोरोना लसीची चाचणी तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात असल्याचे म्हटले आहे. याचे परीक्षण खूपच महत्त्वाचे आहे. ही लस सुरक्षित असली पाहिजे. कोरोनाची लागण झालेल्या आणि वृद्ध नागरिकांना प्रथम ही लस देण्यात येणार आहे. असे  रशियाचे आरोग्यमंत्री ओलेग ग्रिडनेव यांनी सांगितले. उफा शहरातील एका कर्करोग केंद्र भवनाच्या उद्घाटनादरम्यान ग्रिडनेव यांनी ही माहिती दिली आहे. 

गामालेया रिसर्च इन्स्टिट्यूट आणि रशियन संरक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही कोरोना लस विकसित करण्यात आली आहे. जेव्हा संपूर्ण देशातील सर्व लोकांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली होईल, तेव्हा कोरोनाच्या लसीचा प्रभावी अंदाज लावता येईल, असेही त्यांनी नमूद करण्यात आले आहे. 

 "