Tue, Sep 29, 2020 19:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज यांची मोदींवर टीका म्हणजे, ‘देर आए दुरुस्त’

राज यांची मोदींवर टीका म्हणजे, ‘देर आए दुरुस्त’

Published On: Mar 19 2018 12:09PM | Last Updated: Mar 19 2018 12:19PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आजपर्यंत कधीच केली नाही इतक्या आक्रमक शब्दात टीका केली. राज यांच्या या भाषणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीचा देखील एक संदर्भ होता. त्यामुळेच की काय राज यांच्या या भाषणावरील पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्याकडून आली आहे.  

वाचा : देश, महाराष्ट्र मोदीमुक्‍त करा- राज ठाकरे

राज यांनी शिवाजी पार्कवर मोदी मुक्त भारताची घोषणा केली. हाच संदर्भ पकडून राष्ट्रवादीचे आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी राज यांना पाठिंबा देत ‘देर आए दुरुस्त आए’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटरवर आव्हाड म्हणतात, आम्ही जे वर्षानुवर्षे सांगत होतो ते राज ठाकरे यांनी बोलल्यावर गांभीर्याने घेतले. हिंदू-मुस्लिम यांना लढवल्याशिवाय भाजप जिंकू शकत नाही. भाजपला केवळ सत्ता हवी आहे त्यासाठी देश तुटला तरी चालेल असे त्यांचे धोरण आहे. 

वाचा : गुजराती पाट्यांवर मनसे सैनिकांकडून खळखट्याक(व्हिडिओ) 

पंतप्रधान मोदींच्या जवळ गेल्यावर राज ठाकरेंना कळाले की ते कसे आहेत. राज यांनी मोदीमुक्त भारताची घोषणा केली आहे. शेवटी ‘देर आए दुरुस्त आए’, असे सांगत आव्हाड यांनी राज भविष्यात राष्ट्रवादी सोबतच असतील असे अप्रत्यक्षपणे सुचवले आहे.

Image may contain: text

 

Image may contain: text

Tags : Raj Thackeray,MNS,Jitendra Awhad, NCP