Wed, Aug 12, 2020 00:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३ ऑगस्टपासून

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३ ऑगस्टपासून

Last Updated: Jul 14 2020 1:43AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन येत्या दि. 3 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानमंडळातील कर्मचारी-अधिकार्‍यांची संख्या 15 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आली आहे.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे अधिवेशन चार दिवस अगोदरच गुंडाळण्यात आले होते. या काळात कर्मचार्‍यांची उपस्थिती केवळ 5 टक्के होती. मात्र, कामकाजासाठी ती 15 टक्क्यांवर नेण्यात आली. आता अधिवेशनासाठी विधिमंडळ कर्मचार्‍यांची संख्या 50 टक्क्यांवर नेण्यात आली आहे. कोरोनामुळे विधानभवनातील एका कर्मचार्‍याचे निधन झाले आहे. तर आणखी 17 कर्मचारी बाधित झाले आहेत. ज्यामध्ये 8 पोलीस कर्मचारी आहेत. यातील बहुतेक कर्मचारी बरे झाले आहेत.  

सक्तीच्या उपस्थितीव्यतिरिक्त इतरांना रोस्टर पद्धतीने कार्यालयात यावे लागणार आहे. विधिमंडळात मुख्य सुरक्षा अधिकारी आणि अग्निशमन कार्यालयातील कर्मचार्‍यांना 50 टक्के उपस्थिती करण्यात आली आहे. दिव्यांग कर्मचार्‍यांना घरातूनच काम करण्यास मुभा देण्यात आली आहे.

विधानभवन सचिव राजेंद्र भागवत यांनी कर्मचारी व अधिकार्‍यांच्या उपस्थितीबाबत कामकाज सल्लागार समितीस अवगत करण्यात येईल.  त्यांच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.