Sun, Aug 09, 2020 13:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईकरांसाठी उद्याचा रविवार ब्लॉकवार

मुंबईकरांसाठी आज ब्लॉकवार

Last Updated: Jul 11 2020 4:53PM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी वृत्तसेवा

अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी मध्य रेल्वेवर दररोज लोकलच्या ३५० फेऱ्या चालविण्यात येतात. त्यामुळे रेल्वे रुळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी रविवारी (दि. १२) रोजी रेल्वे मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

वाचा : कोरोना नष्ट होणे अशक्य; WHO ने दिली धोक्याची सूचना

या ठिकाणी मेन लाईनवर विद्यावहार ते ठाणे दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम होणार आहे. या दरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन जलद विशेष लोकल सकाळी ९.१० ते दु.२.३० या वेळेत माटुंगा ते दिवा दरम्यान धिम्या मार्गावरुन धावतील.

तसेच सकाळी ९.५८ ते दुपारी ३.१८ या वेळेत सुटणाऱ्या जलद लोकल दिवा ते माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहेत याची नोंद घेवून प्रवाशांनी आपला प्रवास करावा असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

वाचा : 'कोरोना हे १०० वर्षांतील आरोग्य, अर्थव्यवस्थेवरील सर्वांत मोठे संकट'