Tue, Sep 29, 2020 09:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्रातील दोन तुरुंग कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती सुधारात्मक सेवा पदक

महाराष्ट्रातील दोन तुरुंग कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती सुधारात्मक सेवा पदक

Last Updated: Aug 15 2020 1:06PM

राष्ट्रपती रामनाथ कोविंदनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
 
देशातील ५५ तुरुंग अधिकारी व कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कार्यासाठी सुधारात्मक सेवा पदक जाहीर झाले. महाराष्ट्रातील दोन कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती सुधारात्मक सेवा पदक तर दोघांना सुधारात्मक सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. स्वांतत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुधारात्मक सेवा पदकांस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी मंजुरी दिली.
 
तुरूंगसेवेत कैद्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या उपक्रमाबद्दल सुधारात्मक सेवा पदक प्रदान करण्यात येतात. देशातील नऊ तुरुंग अधिकाऱ्यांची राष्ट्रपती सुधारात्मक सेवा पदकासाठी निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातून सुभेदार तानाजीराव खाडे आणि हवालदार विजय काटकर यांना हे मानाचे राष्ट्रपती सुधारात्मक सेवा पदक जाहीर झाले आहे.

याशिवाय, देशातील ४६ तुरुंग अधिकारी-कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. अधीक्षक कौस्तुभ कुरळेकर आणि हवालदार सिध्दार्थ वाघमारे यांना उल्लेखनीय सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. 
 

 "