Wed, Jun 23, 2021 00:36




मुंबईसह उपनगरात सकाळपासून पावसाची जोरदार हजेरी

Last Updated: Jun 11 2021 8:43AM





मुंबई (कुर्ला) ; पुढारी वृत्‍तसेवा : काल (गुरुवार) थोडी उसंत घेतलेल्या पावसाने मुंबईसह उपनगरात आज (शुक्रवार) सकाळपासूनच जोरदार हजेरी लावली  आहे. त्यामुळे मुंबईत सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. कुर्ला, सायन, हिंदमाता, चेंबूर भागात  पाणी भरले आहे. 

अधिक वाचा : शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचे पीक कर्ज आता बिनव्याजी!

वरून बरसणारा पाऊस आणि दुसरीकडे परिसरातील रस्‍त्‍यावर मोठ्या प्रमाणात पाणी भरल्यामुळे वाहनचालकांना गाडी चालवणे कठीण होत आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पावसाची रिपरिप सुरूच आहे. त्यामुळे जे मुंबईकर आता कामानिमित्त घराबाहेर पडणार आहेत. त्यांना पावसाच्या पाण्यातून वाट काढत जावं लागणार आहे. या पावसाचा सध्या तरी मुंबई च्या लोकल सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही, मात्र असाच पाऊस बरसत राहिल्‍यास रल्‍वे रूळावर पाणी येउन मुंबईची लाईफ लाईन समजल्‍या जाणाऱ्या लोकल वाहतूकीवर परिणाम होउ शकतो. मात्र सध्या पावसाने मुंबई मध्ये विश्रांती घेतल्‍याचे चित्र आहे.