Wed, Oct 28, 2020 11:32



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › परीक्षांसह निकाल रखडण्याची शक्यता

परीक्षांसह निकाल रखडण्याची शक्यता

Last Updated: Sep 29 2020 2:27AM




मुंबई : पुढारी वृत्तसेवा

विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील कर्मचारी आणि अधिकार्‍यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे. सरकारची आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबतची चर्चा निष्फळ ठरली.   जोपर्यंत  जीआर निघत  नाही  तोपर्यंत  माघार  नाही   अशी भूमिका घेतल्याने   राज्यातील विद्यापीठांतील कर्मचार्‍यांचे लेखणी बंद आंदोलन सुरूच राहणार आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश   सर्वच   विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या परीक्षांवर याचा परिणाम होणार असून निकालही रखडण्याची शक्यता आहे.राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयांतील कर्मचारी यांनी सुरू केलेल्या  आंदोलनाची  दखल  घेऊन  उच्च  व  तंत्रशिक्षण  मंत्री  उदय  सामंत  यांनी  महाराष्ट? राज्य महाविद्यालयीन  व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत   चर्चा केली. गेल्या   दोन   वर्षांपासून केवळ आश्वासनेच मिळत असल्याने जोवर प्रलंबित  मागण्यांबाबत जीआर निघत नाही, तोवर आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.आंदोलनाची दखल घेत सामंत  यांनी  शिष्टमंडळासोबत  ऑनलाईन चर्चा केली.  

यावेळी सामंत यांनी महाविद्यालयीन व विद्यापीठीय कर्मचार्‍यांच्या मागण्या रास्त असून त्यांच्या प्रत्येक मागण्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून लवकरात लवकर मार्ग काढेन तोवर संघटनांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन सामंत यांनी केले. मात्र समितीच्या शिष्टमंडळाने सर्व मागण्यांबाबत अध्यादेश निर्गमित होत नाही, तोवर राज्यव्यापी आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान या आंदोलनाचा फटका सोमवारी दिवसभर बसला. विद्यापीठातील अधिकारी  आणि  कर्मचार्‍यांच्या मागण्यांसाठी पुकारलेल्या लेखणी बंद आंदोलनात मुंबई विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. फोर्ट आणि कलिना कॅम्पसमध्ये परीक्षा भवन येथे अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आंदोलन केले. यामुळे विद्यापीठातील  सर्व  व्यवहार ठप्प झालेले  पहायला मिळाले.





 







"