Fri, Sep 25, 2020 18:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोव्हीशिल्डच्या मानवी चाचणीचा मार्ग मोकळा

कोव्हीशिल्डच्या मानवी चाचणीचा मार्ग मोकळा

Last Updated: Sep 16 2020 12:34PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

भारतात सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाकडून (एसआयआय)  सुरु असलेल्या ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी अॅस्ट्राजेनेकाच्या संभावित कोरोना लस कोव्हीशिल्डची मानवी चाचणी थांबवण्यात आली होती. पंरतू, आता भारतीय औषधी महानियंत्रकांनी (DCGI) चाचणी पुन्हा सुरु करण्याची परवानगी दिली आहे.

अधिक वाचा : मुंबईत दररोज ५०० किलो ड्रग्ज फस्त!

दुसऱ्या तसेच तिसऱ्या टप्यातील मानवी चाचणीकरीता आता उमेदवारांची भरती सुरु करण्याचा सीरम इन्स्टीट्युटचा मार्ग मोकळा झाला आहे. सीरमला खास अटी, शर्थीच्या अधीन राहून चाचणीची परवानगी देण्यात आली आहे, हे विशेष. सीरम इन्स्टीट्युटला पडताळणी तसेच उमेदवारांना लस दिल्यानंतर त्याचे परिणाम नोंदवताना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन परवानगी देताच DCGI कडून करण्यात आले आहे. प्रतिकूल परिणाम दिसल्यास व्यवस्थापनासाठी असलेल्या प्रोटोकॉलनूसार औषधांचा तपशील सीरम इन्स्टिट्युटला DCGI समक्ष सादर करावे लागणार आहेत.

अधिक वाचा : भारतात तीन लसी चाचणीच्या टप्प्यात

दरम्यान काही दिवसांपूर्वी ब्रिटनेमध्ये लस दिलेल्या एका व्यक्तीवर प्रतिकूल परिणाम दिसू लागल्याने अॅस्ट्राजेनेका औधष निर्मात्या कंपनीने मानवी चाचणी थांबवली होती. त्याच पार्श्वभूमीवर ११ सप्टेंबरला भारतामध्ये एसआयआयला मानवी चाचणीसाठी पुढील आदेश मीळेपर्यंत नवी उमेदवार भरती थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते.

अॅस्ट्राजेनेकाने एसआयआय सोबत त्यांच्या कोरोना लसीच्या उत्पादनासाठी भागीदारी केली आहे. दरम्यान मंगळवारी डेटा अँड सेफ्टी मॉननिटरिंग बोर्डाच्या रेकमेंडेशंस ब्रिटेन, भारत मध्ये सादर केल्या आहेत. त्यानुसार पुढील उमेदवारांसाठी परवानगी द्यावी असे सांगण्यात आले आहे.

अधिक वाचा : देशातील 'या' मार्गावर जगातील सर्वात मोठा बोगदा पूर्णत्वास, तब्बल १० वर्ष सुरु होते काम!

नव्या नियमावलीनुसार एसआयआयने देखील पुन्हा नवी उमेदवारांच्या माहितीची यादी बनवली आहे. त्यामध्ये सुरक्षेची अधिक काळजी घेतली जाणार आहे. लसीचा डोस दिल्यानंतर आता ७ दिवस सेफ्टी फॉलोअप सादर केला आहे. यामध्ये अद्याप कुणावरही प्रतिकूल परिणाम नसल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये सौम्य परिणाम आपोआप ठीक झाले आहे, तसेच त्याचे पुन्हा कोणते दुष्परिणाम दिसले नसल्याचे सांगण्यात आले आहे.

 "