Sun, Sep 20, 2020 09:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे : 'त्या' खासगी रूग्णालयातील डॉक्टर्स-कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश 

ठाणे : 'त्या' खासगी रूग्णालयातील डॉक्टर्स-कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश 

Last Updated: May 27 2020 1:30PM

ठाणे महानगरपालिकाठाणे : पुढारी वृत्तसेवा

ठाणे शहरामध्ये कोरोनाचा सामना करण्यासाठी आणि कोरोना बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने अधिगृहित केलेल्या खासगी रूग्णालयातील डॅाक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी त्या त्या रूग्णालयांमध्ये कामावर उपस्थित न राहिल्याने संबंधित डॅाक्टर्स आणि इतर कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत. याकामी महापालिकेच्या तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना दिलेला 'तो' प्रस्ताव माहित आहे का?

ठाणे शहरामध्ये कोरोनाचा सामना करता यावा आणि रूग्णांवर तातडीने उपचार करता यावेत यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने अनेक खासगी रूग्णालये त्यामध्ये काम करणाऱ्या डॅाक्टर्स आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांसह अधिगृहित करण्यात आली आहेत. महापालिका प्रशासनाने यापूर्वी तसे आदेशही निर्गमित केले आहेत.

तथापि कौशल्या हॅास्पिटल, होरायझन प्राईम आणि ठाणे हेल्थ केअर सेंटर या रूग्णालयातील डॅाक्टर्स आणि इतर कर्मचारी हे सेवेत हजर झालेले नाहीत. सदरची बाब लक्षात घेवून या तीनही हॅास्पिटलमधील सेवेत हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांविरोधात भारतीय दंड संहिता कलम १८८ मधील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत.

मुख्य सचिव अजोय मेहतांना पुन्हा मिळणार वर्षभराची मुदतवाढ

यासंदर्भात होरायझन प्राईम रूग्णालयासाठी डॅा. अनिता कापडणे, ठाणे हेल्थ केअरसाठी डॅा. शलाका खाडे आणि कौशल्या हॅास्पिटलसाठी डॅा. अश्विनी देशपांडे हे वैद्यकीय अधिकारी प्राधिकृत करण्यात आले आहेत. 

 "