Mon, Aug 10, 2020 20:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › करदात्यांना दिलासा! कर वाचविणाऱ्या योजनांत गुंतवणूक करण्यास मुदतवाढ 

करदात्यांना दिलासा! कर वाचविणाऱ्या योजनांत गुंतवणूक करण्यास मुदतवाढ 

Last Updated: Jul 02 2020 12:22PM

File Photoनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

वैयक्तिक आयकर म्हणजेच प्राप्तीकर वाचविण्यासाठी विविध प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास केंद्र सरकारने ३१ जुलैपर्यंत संधी दिली आहे. ज्या लोकांनी कर वाचविण्यासाठी अजूनपर्यंत कुठेही अथवा फारशी गुंतवणूक केलेली नाही, त्यांना या सुविधेचा मोठा फायदा मिळणार आहे. 

सध्याची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन लोकांना कर वाचविणाऱ्या योजनांत गुंतवणूक करण्यास मुदतवाढ दिली जात असल्याचे आयकर विभागाकडून गुरुवारी सांगण्यात आले. 

आर्थिक वर्ष २०१९-२० साठी आयटीआर भरणा करण्याची तारीख ३१ जुलै २०२०२ ही होती. तथापि कोरोनाचे संक्रमण आणि तीन महिन्यापासून लागू असलेले लॉकडाऊन या पार्श्वभूमीवर आयटीआर भरणा करण्याची तारीख ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.