होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सलग दुसऱ्या दिवशी पेणमध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू

सलग दुसऱ्या दिवशी पेणमध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू

Last Updated: Jul 03 2020 9:28PM

प्रातिनिधीक फोटोपेण :  पुढारी वृत्तसेवा

पेण तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे मृत्यू झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. नवघर येथील पुरूषाचा मृत्यू झाला होता. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील मृत्यूची संख्या आता ३ झाली आहे. 

अखेर जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलली

रायगड जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढत असतानाच आता कोरोनामुळे मृत होण्याचा आलेखही वर चढत आहे. जिल्ह्यात १४९ कोरोनाबाधितांची नोंद असून सध्या शहरातील ५४ आणि ग्रामीण भागातील २१ पॉझिटिव्ह रूग्ण आहेत. तर आजपर्यंत ७१ जण बरे झाले असून आज शुक्रवारी ३ रूग्ण बरे झाले आहेत. ते शहरातील हनुमान आळी येथील २, झोतिरपाडा गावातील १, असे एकूण ३ रूग्ण आहेत.

'कोरोनाबाधित मृतदेहांवर योग्य खबरदारी घेऊनच अंत्यसंस्कार'

आज सापडलेल्या रुग्णामध्ये 

पेण शहरातील २, 

यात शीतलविहार १, गोविंदबाग १ 

ग्रामीण भागातील ३

यात अंतोरे १, खारपाडा १, वरेडी ३