Wed, Oct 28, 2020 10:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'नया है वह' म्‍हणत फडणवीसांचे आदित्‍य ठाकरेंना प्रत्‍युत्‍तर 

'नया है वह' म्‍हणत फडणवीसांचे आदित्‍य ठाकरेंना प्रत्‍युत्‍तर 

Last Updated: Jul 12 2020 2:09PM

File Photoमुंबई : पुढारी ऑनलाईन 

मंत्री बनवल्‍याने शहाणपण येत नाही असे म्‍हणून नया है वह असा टोला लगावत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण मंत्री आदित्‍य ठाकरेंच्या टीकेला प्रत्‍युत्‍तर दिले. आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्‍यांनी राज्‍य सरकारवर टीकेची झोड उठवली. 

 फडणवीस पुढे म्‍हणाले राज्‍य सरकार कोरानाग्रस्‍तांची संख्या लपवत आहे. सरकारेने चाचण्यांचे प्रमाण कमी केले आहे. हे प्रमाण वाढवण्याची गरज आहे. तरच कोरोनाबाधितांची खरी संख्या समोर येईल. 

त्‍यानंतर पत्रकारांनी आदित्‍य ठाकरेंच्या टिकेवरून फडणवीस यांना प्रश्न विचारला. त्‍यावर मुख्यमंत्री ज्‍याला वाटेल त्‍याला मंत्री बनवत आहेत. मात्र मंत्री बनवल्‍याने शहाणपण येतचं अस नाही, अस फडणवीस म्‍हणाले.तसेच त्‍यांनी आदित्‍य ठाकरे यांच्यावर नया है वह असा उपरोधिक टोला लगावला. 

 "